काल शुक्रवारी २६ जानेवारी रोजी चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे हिने तिच्या ‘बिग फिश’ रेस्टोरंटचे उद्घाटन केले. यावेळी भाऊ कदम, सुकन्या मोने, हर्षदा खानविलकरसह मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांनी श्रेयाच्या रेस्टोरंटला सदिच्छा भेट दिली. गेल्या काही दिवसांपासून चला हवा येऊ द्या हा शो बंद होणार अशी चर्चा पाहायला मिळाली होती. त्यामुळेच की काय यातील कलाकार मंडळी आता उत्पन्नाचे साधन म्हणून पर्यायी मार्गाची निबीड करताना दिसत आहेत. कारण श्रेया बुगडे पाठोपाठ आता चला हवा येऊ द्या शोचा संगीत दिग्दर्शक म्हणजेच तुषार देवल हा देखील मिसळ स्टॉल सुरू करताना दिसत आहे. तुषार देवल आणि स्वाती देवल हे कलाकार दाम्पत्य गेली अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत.
पण नुकत्याच एका मिसळ मोहोत्सवात त्यांनीही त्यांच्या मिसळचा एक स्टॉल उभा केला आहे. या स्टॉलची ओळख करून देताना तुषार म्हणतो की, “आम्ही नवीन व्यवसाय सुरू केला आहे.( तुषारला थांबवत स्वाती पुढे म्हणते की) पण अगोदरचा व्यवसाय आम्ही सोडलेला नाही, तो उत्तमच चालू आहे. पण आजची खासियत अशी आहे की आम्ही बोरिवली पूर्व मध्ये अभ्युदय नगर येथे भव्य मिसळ मोहोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवात आम्ही आमच्या मिसळचा स्टॉल लावलेला आहे. याशिवाय आम्ही एका खास प्रकारचे एक सरबत आमच्या ग्राहकांसाठी घेऊन आलो आहोत. त्यामुळे खायची आणि प्यायची अशी दोन्हींची सोय आमच्याकडे करण्यात आलेली आहे. ” असे म्हणत स्वाती आणि तुषार देवलने त्यांच्या या नवीन व्यवसायाची ओळख करून दिली आहे. २६ जानेवारी रोजी हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून सलग तीन दिवस म्हणजेच २८ जानेवारी पर्यंत खवय्यांना इथल्या मिसळ मोहोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे.
आज या मिसळ मोहोत्सवाला राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी तुषार देवलच्या मिसळ स्टॉलला त्यांनी आवर्जून भेट दिली आणि या व्यवसायानिमित्त त्यांनी तुषारला शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाल्याने तुषार देवल खूपच भारावून गेला होता. या मिसळ मोहोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला प्रथमच राज ठाकरे यांना जवळून पाहता आलं आणि त्यांनी पाठीवर हात ठेवून आशीर्वाद दिला हे पाहून आपण कृतकृत्य झालो अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. दरम्यान हा मिसळचा स्टॉल तात्पुरत्या स्वरूपाचा असला तरी खवय्यांकडून त्याच्या मिसळला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात स्वाती आणि तुषार देवल साईड बिजनेस म्हणून या व्यवसायाकडे वळले तर नवल वाटायला नको.