भैय्यानीसोबत लग्न केलं, तुम्ही मराठी दळभद्री कलाकार … करवाचौथ साजरा केल्याने मराठी अभिनेता ट्रोल दिल सणसणीत उत्तर
२० ऑक्टोबर रोजी देशभरात करवा चौथ साजरा करण्यात आला. काही मराठी सेलिब्रिटींनी अमराठी व्यक्तींशी लग्नगाठ बांधली म्हणून त्यानीही त्या रीतिभाती पाळून करवाचौथ साजरा केला. अगदी श्वेता शिंदे, जान्हवी पणशीकर, सई देवधर, तेजा देवकर, कपिल होनराव, मंदार जाधव हे सेलिब्रिटीसुद्धा करवा चौथ साजरा करताना दिसले पण यामुळे अभिनेता कपिल होनराव याच्यासर कडक शब्दांत टीका करण्यात आली. ‘तू भैय्यानी सोबतच लग्न केलंय’ असं त्याला लोक म्हणू लागले. काही दिवसांपूर्वी सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता झाला म्हणून कपिलने सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली होती.
१० वर्षांचा स्ट्रगल करूनही मला मनासारखं काम मिळालं नाही पण सुरजने त्याच्या मेहनतीवर अल्पावधीतच मोठं यश मिळवलं असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते. खरं तर कपिलने सुरजचे कौतुकच केले होते पण लोकांनी त्याच्या या म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला. तू सूरजवर जळतोस अशी त्याच्यावर टीका झाली. त्यावेळी कपिलने त्या पोस्ट मागचा अर्थ लोकांना समजावून सांगितला. पण नुकत्याच साजर्या केलेल्या करवाचौथ मुळे कपिल पुन्हा एकदा ट्रोल झाला. या ट्रोलर्सना उत्तर देताना कपिल म्हणतो की, ” मी भैय्यानीसोबत लग्न केलं…तुम्ही मराठी दळभद्री कलाकार हा सण सेलिब्रेट करताय… असं करताय, पण अरे मी नमाज तर पढायला नव्हतो गेलो कुठल्या मस्जिदमध्ये… मी माझ्या बायकोसोबत करवाचौथ जो हिंदूंचा सण आहे ना….काही लोकांनी शिवाजी महाराजांचे डीपी ठेवलेत आणि ते माझ्या बायकोबद्दल असं बोलतायत…ही जी लायकी काढली जाते ना तिथं माझं सटकलं…
अशा कमेंट्स करण्याआधी सत्य परिस्थिती जाणून घ्या….वीट आलाय यार या लोकांचा… माझी बायको नॉर्थ साइडची आहे. हिंदी भाषिक आहे, करवा चौथ हा तिचा सण आहे. जशी ती माझ्याबरोबर सगळे मराठी सण साजरे करते, अगदी तशाचप्रकारे मी सुद्धा हा सण तिच्यासाठी साजरा करतो. माझी महान मराठी परंपरा, मराठी संस्कृती हे नाही करायचं असं कधीच बोलू शकत नाही. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यावर कमेंट करताना जरातरी विचार करा.”