news

खास आई वडिलांसाठी घेतलं अभिनेत्याने नवीन घर…नव्या घराची झलक पाहिली का

गेल्या काही दिवसांत कित्येक मराठी सेलिब्रिटी त्यांच्या हक्काचं घर घेऊ शकले आहेत. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या आईवडिलांसाठी घर खरेदी केलं आहे. अभिनेता भूषण प्रधान हा गेली कित्येक वर्षे मराठी इंडस्ट्रीशी जोडलेला आहे. गेल्या काही दिवसांत त्याचे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. याच चित्रपटांच्या कमाईतून त्याने आईवडिलांसाठी घर खरेदी केलं आहे. नुकताच भूषणच्या आईवडिलांनी त्यांच्या या घरात गृहप्रवेश केलेला आहे. या नवीन घराच्या आकर्षक इंटेरिअरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

bhushan pradhan new home
bhushan pradhan new home

भूषण प्रधानची आई या चिंचवड येथील कमलनयन बजाज शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. आता त्या शिक्षक पदावरून निवृत्त झाल्या आहेत. आईवडिलांना घर गिफ्ट करण्यामागे भूषणने एक खास कारण सांगितलं आहे. तो म्हणतो की, “गेल्या ६ महिन्यांत कल्पनेपलीकडचे आशीर्वाद मिळाले आहेत! माझे दोन्ही चित्रपट… ‘जुनं फर्निचर’ आणि ‘घरत गणपती’ मनाला भिडले! जुनं फर्निचरने आम्हाला आठवण करून दिली की आमच्या पालकांचे वय वाढत असताना त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. घरत गणपतीने गणेशोत्सवात कौटुंबिक आणि एकत्रतेचे सौंदर्य साजरे करण्याचे शिकवले.

bhushan pradhan buy a new home family pics
bhushan pradhan buy a new home family pics

ही गणेश चतुर्थी साजरी करत असताना, एक स्वप्न साकार करताना मला आनंद होत आहे… मी माझ्या पालकांसाठी नवीन घर खरेदी करण्यास सक्षम आहे! ही भावना त्यांनी माझ्यासाठी वर्षानुवर्षे केलेले प्रेम, आदर आणि त्याग दर्शवते. गणपती बाप्पाने आम्हाला खरोखरच आशीर्वाद दिले आहेत, आणि मी तुमच्यासोबत हे शेअर करण्यासाठी यापेक्षा चांगल्या वेळेचा विचार करू शकत नाही. ही आहे नवीन सुरुवात…अंतहीन कृतज्ञता… आणि कौटुंबिक बंध जे कायम टिकतात! गणपती बाप्पा मोरया!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button