मी असा आर्थिक परिस्थितीही बेताची आणि तू दिसायला सुंदर तरीही लग्नाला का होकार दिलास विचारल्यावर … तेंव्हा वैशालीने दिले होत हे उत्तर
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अरुण कदम काही दिवसांपूर्वीच आजोबा झाले. अरुण कदम यांची लाडकी लेक सुकन्या हिने मुलाला जन्म दिला. नातवाच्या आगमनाच्या चाहुलीनेच अरुण कदम यांना खूप आनंद झाला होता. नातवाच्या नामकरण सोहळ्यात अरुण कदम यांच्या पत्नीनेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अरुण कदम यांच्या पत्नी दिसायला सुंदर या दोघांचे अरेंज मॅरेज होते पण दिसायला अतिशय साधारण असलेल्या अरुण कदम यांना वैशालीने लग्नासाठी का होकार दिला असा मोठा प्रश्न पडला होता. त्यांची ही भन्नाट लव्हस्टोरी नेमकी कशी होती ते जाणून घेऊयात…
महाराष्ट्राची हास्यजत्रा असो किंवा कॉमेडीची बुलेट ट्रेन या सर्वांमधून दादूसने त्यांच्या आगरी कोळी भाषेने भुरळ घातली आहे. खरं तर अरुण कदम यांच्या कारकिर्दीची सुरुवात शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारामधून झाली होती. केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी अशा कलाकारांच्या जोडीला लोकधारामध्ये अरुण कदम चमकले होते. कलेची आवड जोपासत असतानाच अरुण कदम यांना मुंबईच्या महानगरपालिकेत नोकरी मिळाली. एका मित्राने अरुण कदम यांना वैशालीचे स्थळ सुचवले होते. वैशालीला बघायला ते त्यांच्या मित्रासोबत गेले होते तेव्हा त्यांना वैशाली खूप आवडली होती. तर वैशालीच्या वडिलांनीही अरुण कदम यांना आपला होकार दिला होता. वैशाली दिसायला एवढ्या सुंदर असूनही त्यांनी आपल्यासोबत लग्नाला होकार का दिला? हे अरुण कदम यांना जाणून घ्यायचे होते.
कारण अरुण कदम त्यावेळी अभिनय क्षेत्रात हळूहळू जम बसवत होते आणि आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती. आपण दिसायलाही सर्वसाधारण त्यामुळे वैशालीने या लग्नाला होकार का दिला हे जाणून घेण्यासाठी त्यांनी वैशालीला भेटायचे ठरवले. गोरेगाव येथील छोटा कश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या दोघांनी भेट घेतली. तेव्हा वैशालीने तिच्याकडून होकार असल्याचे सांगितले. वडिल ज्या मुलासोबत लग्न लावतील ते मला मान्य आहे असे त्यांनी उत्तर दिले होते. त्यानंतर मोठ्या थाटात दोघांचेही लग्न झाले. लग्नानंतर लेक सुकन्याचा जन्म झाला. तिच्या येण्याने अरुण कदम यांचे करिअर भरभराटीला आले. वेगवेगळे रिऍलिटी शो तसेच चित्रपट असा त्यांचा प्रवास सुरळीत सुरू झाला.