मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची नुकतीच झाली एंगेजमेंट… एंगेजमेंटचे फोटो होताहेत तुफान व्हायरल
मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. काहीच दिवसांपूर्वी अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांचा लग्नसोहळा थाटात पार पडलेला पाहायला मिळाला. तर बालकलाकार म्हणून प्रसिद्धीस आलेला अनुराग वरळीकर याने आज साखरपुडा करून सेलिब्रिटींना तसेच चाहत्यांनाही आश्चर्याचा एक सुखद धक्काच दिलेला आहे. अनुराग वरळीकर याने त्याची खास मैत्रीण पायल साळवी हिच्यासोबत आज एंगेजमेंट केली आहे. ब्लॅक कलर्सच्या डिझायनर आऊटफिटमध्ये पायल आणि अनुराग खूपच सुरेख दिसत होते. त्यांच्या या एंगेजमेंट सोहळ्यात त्यांनी खास पाहुण्यांनाच आमंत्रित केले होते. त्यामुळे हा सोहळा नातेवाईक मित्रमंडळींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या एंगेजमेंटचे काही खास क्षण अनुरागने सोशल मीडियावर शेअर करताच स्पृहाने अनुरागचे अभिनंदन करताना एक मजेशीर कमेंट देखील केलेली आहे. “सुराला कच्चा आहे… पण मुलगा चांगला आहे!!… अभिनंदन!” असे म्हणत स्पृहाने हा कमेंटमुळे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात ज्यांना अनुराग माहिती आहे त्यांना स्पृहाच्या कमेंटचा अर्थ नक्कीच लागला असेल. कारण अनुरागचा आवाज खूप घोगरा आहे. त्याने लहानपणी देवकी या गाजलेल्या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटातील त्याचा आवाज आजही प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात राहिलेला असावा. असो पण अनुरागच्या या एंगेजमेंट मुळे तो आता लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार हे निश्चित झाले आहे.
अनुराग वरळीकर हा बालकलाकार म्हणून खूप लोकप्रिय ठरला होता. पण कालांतराने त्याला मराठी सृष्टीत खूप कमी प्रोजेक्ट साकारण्याची संधी मिळाली. देवकी हा अनुरागने अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट ठरला होता. या चित्रपटामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. पुढे दे धमाल या मालिकेतही तो झळकला होता. पोर बाजार, मिशन चॅम्पियन, निवडुंग, बारायण, झी युवा वरील श्वेता शिंदेची मालिका डॉ डॉन, वृत्ती या मोजक्याच मालिका तसेच चित्रपटातून अनुराग प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. डॉ डॉन या मालिकेत तो श्वेता शिंदेच्या मुलाची भूमिका साकारताना दिसला होता. अभिनय क्षेत्राची आवड जोपासत असताना अनुरागने मास कम्युनिकेशनचे धडे गिरवले आहेत. यासोबतच त्याला दिग्दर्शन क्षेत्राची देखील विशेष आवड आहे. दिग्दर्शक म्हणून तो सध्या काही प्रोजेक्ट देखील करत आहे.