१५ मार्च रोजी सुदिप्तो सेन दिग्दर्शित बस्तर द नक्सल स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. दोन दिवसात या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर १ कोटी १५ लाखांचा गल्ला आपल्या खात्यात जमवला आहे. केरला स्टोरी नंतर अदा शर्मा हिचा हा आणखी एक चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटात एक भयाण वास्तव दाखवण्यात आलं आहे त्यामुळे हा चित्रपट सगळ्यांनी पाहायला हवा अशी विचारसरणी पुढे आली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रीमियरला अजय पुरकर यांनी हजेरी लावली होती. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाने हा चित्रपट पाहायला हवा अशी प्रतिक्रिया अजय पुरकर यांनी दिली आहे. ते म्हणतात की, “काल बस्तर द नक्सल स्टोरी या नावाचा झंझावात पाहिला. काल पुण्यामध्ये सिटी प्राईड कोथरूड येथे त्याचा प्रिमियर होता. त्यामध्ये जे खलनायकाची भूमिका करणारे विजय आहेत त्यांची भेट झाली.
अभिनेत्री तिवारी काय अप्रतिम काम केलंय तिने, आणि ऑफ कोर्स अदा शर्मा हिनेही काय सुंदर काम केलंय , सुदीप्तो सेन यांनी पुन्हा एकदा केरला स्टोरी नंतर अप्रतिम सिनेमा केलेला आहे. चित्रपटाच्या लेखकाचंही खूप खूप अभिनंदन की केरला स्टोरी नंतर त्यांनी एक धमाका आणलेला आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट बघा. आणि तुम्हीच नका बघू तर तुमच्या मुलांना देखील दाखवा. देशात आतून जी कीड लागलेली आहे , जी वाळवी लागलेली आहे, जो देश पोखरत आहे ना त्या सगळ्या लोकांना नागडं केलेलं आहे या चित्रपटानी. त्यामुळे हे जे लोक आहेत ना ती सगळी आपल्या आजूबाजूला आहेत, शाळेत आहेत, कॉलेजेस मध्ये आहेत, आपण जिथे काम करतो तिथे आहेत. आपल्या इंडस्ट्री मध्ये आहेत त्यांच्यापासून सावध रहा. तुमच्या मुलांना सावध राहायला सांगा नाहीतर हा देश संपवतील ही लोकं. आणि त्यासाठी त्यांच्या सणसणीत कानाखाली मारलेली आहे या नक्षल स्टोरीने.
आवर्जून बघा, प्रत्येक भारतीयाने बघा, जय हिंद…” असे परखड मत अजय पुरकर यांनी व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिताना त्यांनी त्यात म्हटलं आहे की, ” Cheers to the team …BASTAR …THE NAXAL STORY… प्रत्येक भारतीयांनी बघावा….आपल्या मुलांना नक्की दाखवा …. आपल्या आसपास हे लोक वावरत असतात…त्यांच्यापासून सावध रहा….कीड आहे देशाला लागलेली…. त्याचं समूळ उच्चाटन होईलच पण ते कसं करत आहेत ह्याची गोष्ट म्हणजे …..BASTAR….THE NAXAL STORY…. HATS OFF TO THE TEAM….Vipul Shah sir…Amarnath Jha sir..Vijay rishna…..Indira Tiwari….kamaal performances….Last but not the least ….Ada Sharma……kadak salute Jai Hind”