थाटात पार पडला प्रसिद्ध अभिनेत्याच्या आई वडिलांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस….सेलिब्रिटी कुटुंबाची हजेरी
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांचे आई वडील शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. पन्नास वर्षांपूर्वी १८ डिसेंबरला त्यांचे लग्न झाले होते मात्र २२ डिसेंबर रोजी हा सोहळा साजरा केला गेला. या सोहळ्याला अभिनेत्री भारती आचरेकर, राणी वर्मा यांनीही हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अद्वैत दादरकर याचे कुटुंब कला क्षेत्राशी निगडित आहे. त्याचे आजीबा विद्याधर गोखले हे संगीतकार होते. अद्वैतचे मामा हे विजय गोखले हे दिग्दर्शक आहेत.
तर वंदना गुप्ते, राणी वर्मा, भारती आचरेकर या अद्वैतच्या आत्ये बहिणी आहेत. श्रीकांत दादरकर हे माणिक वर्मा यांचे भाऊ आहेत. अग्निहोत्र ही अद्वैतची अभिनित केलेली पहिली मालिका होती. बालमोहन शाळा आणि रुपारेल कॉलेजमध्ये असताना तो नाटकाशी जोडला गेला. कलेचा, संगीताचा वारसा लाभलेल्या अद्वैतने या क्षेत्रात स्वतःला अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून सिद्ध करून दाखवलं. त्याच्या बहुतेक विरोधी भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत..पण खास म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली.
अभिनेत्री भक्ती देसाई ही त्याची पत्नी. २०१३ मध्ये दोघांनी थाटात लग्न केले होते. दरम्यान गेले काही दिवस भक्ती आणि अद्वैत एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचे बोलले जाते. सासू सासऱ्यांच्या लग्नाच्या वाढदिवसावेळी ती अनुपस्थित असल्याचेही दिसून आले.