गेल्या काही दिवसांत स्टार प्रवाहच्या मालिकेत कलाकारांची रिप्लेसमेंट होत आहे. त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीचे प्रेक्षक मालिकांवर नाराज आहेत. प्रेमाची गोष्ट या लोकप्रिय मालिकेतून तेजश्री प्रधानने एक्झिट घेतली. त्यामुळे तिला परत आणा अशी मागणी प्रेक्षक करताना दिसत आहे. तेजश्री या मालिकेच्या बाबतीत काहीशी नाराजी दर्शवताना दिसली. आपल्या कुवतीपेक्षा कुठेतरी कमी मिळत असेल तर बाजूला होणच योग्य असे तिने एका पोस्टद्वारे म्हटले होते. प्रेमाची गोष्ट मालिकेत अगोदरच २ कलाकारांची रिप्लेसमेंट केली होती त्यात असता तेजश्री प्रधानच्या जागी स्वरदा ठिगळे मुक्ताची भूमिका साकारत आहे.
या मालिकेच्या जोडीलाच आता अबोली मालिकेतून प्रतीक्षा लोणकर यांनी काढता पाय घेतला आहे. प्रतीक्षा लोणकर अबोली मालिकेत रमाची भूमिका साकारत होत्या. पण आता ही भूमिका अभिनेत्री रसिका धामणकर साकारताना दिसणार आहेत. रसिका धामणकर यांनी याअगोदर लग्नाची बेडी मालिकेत सासूची भूमिका साकारली होती. आता मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असल्याने त्यांची अबोली मालिकेत एन्ट्री होत आहे.
रमाची भूमिका प्रतीक्षा लोणकर यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवली होती. पण आता ही भूमिका रसिका धामणकर साकारत असल्याने प्रेक्षक काहीसे नाराज असणार आहेत. दरम्यान प्रतीक्षा लोणकर यांनी मालिका सोडल्याचे कारण अद्याप सांगितलेले नाही. एखादा नवीन प्रोजेक्ट साकारत असल्याने त्या ही मालिका सोडत आहेत असे म्हटले जात आहे.