काही दिवसांपूर्वी आई कुठे काय करते मालिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने ठाण्यात हक्काचं घर घेतलं. इतके वर्षांची मेहनत फळाला आली असे म्हणत रूपालीने तिच्या या स्वप्नपूर्तीचे भावुक क्षण चाहत्यांसोबत शेअर केले होते. रुपाली भोसले पाठोपाठ आता आई कुठे काय करते मालिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनेही हक्काचं घर खरेदी केलेलं पाहायला मिळत आहे. आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मुंबई सारख्या ठिकाणी हक्काचं घर होणं ही गोष्ट साधी सोपी नसली तरी मराठी सृष्टीतील कलाकारांसाठी ते आता शक्य होऊ लागलं आहे.
आई कुठे काय करते या मालिकेचा प्रवास गेली पाच वर्षे अविरत सुरू आहे. मधुराणीलाही हा प्रवास सुखकर गेला असे म्हणावे लागेल. कारण मुंबईत विलेपार्ले पूर्व इथे तिने स्वतःचा फ्लॅट बुक केला आहे. ही स्वप्नपूर्ती पूर्ण झाली असे म्हणत या घराचा एक व्हिडिओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मधुराणी तिच्या लेकिसह हा फ्लॅट बघायला आली आणि पाहताक्षणी तिला या घराचा लूक खूप आवडला. आईवडिलांच्या आणि थोरा मोठ्यांचा कृपा आशीर्वाद ही स्वप्नपुर्ती पूर्ण झाली म्हणत मधुराणीचा हा आनंद द्विगुणित झाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मधुराणीने तिचे सोशल मीडियावरचे प्रभुलकर हे आडनाव हटवले होते तेव्हा प्रमोद प्रभुलकरसोबत ती घटस्फोट घेत असल्याची चर्चा पाहायला मिळाली होती. मधुराणी ही गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीशी जोडलेली आहे. प्रमोद प्रभुलकर सोबत ती एक अभिनय संस्था चालवत होती पण या संस्थेशी आता माझा काही संबंध नाही असे सोशल मीडियावर तिने जाहीर केले होते. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चेला अधिकच उधाण मिळाले. पण या चर्चेनंतर मधुराणी मुंबईत हक्काचं घर घेताना पाहायला मिळत आहे. तिच्या या स्वप्नपूर्तीसाठी मनःपूर्वक अभिनंदन.