“मी पूर्णपणे नास्तिक आहे” म्हणणाऱ्या रेणुका शहाणे स्वतःच गोंधळल्या…नेमकं म्हणायचं तरी काय? प्रेक्षकांना पडला प्रश्न

‘देवमाणूस’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून रेणुका शहाणे मुख्य भूमिका साकारत आहेत. महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाचे विशेष कौतुक होताना दिसत आहे. हा चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून कलाकार मंडळी ठिक ठिकाणी मुलाखती देत आहेत. अशाच एका प्रमोशन दरम्यान रेणुका शहाणे यांनी स्वतःला नास्तिक म्हटलं आहे. पण हे नास्तिक म्हणजे नेमकं काय याचाच अर्थ त्यांना कळलेला नाही की काय अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून दिली जात आहे. कारण त्यांच्या नास्तिक असण्याची व्याख्या उलगडताना त्यांनी स्वतःला अध्यात्मिक देखील म्हटलं आहे.
याबद्दल रेणुका शहाणे म्हणतात की, “मी तर पूर्णपणे नास्तिक आहे. म्हणजे पिढ्या न पिढ्या आमच्या नास्तिक आहेत…माझ्या आज्जीकडेच मी मोठी झाले आणि तिच्याकडे वारकरी संप्रदायाला मानतात. त्यामुळे घरात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांचे फोटो आहेत. सर्वसाधारण सगळीकडे घरात देवांचे फोटो असतात पण आमच्याकडे संतांचे असतात. कारण देव चराचरात आहे!…आपल्यामध्ये, सगळीकडेच देव आहे, कुठली एक जागा नाही अनु, रेणू नाही जिथे देव नाही!…त्यामुळे विधी करणं आणि अध्यात्म या मधला जो फरक आहे ना तो म्हणजे मी आणि दाखवण्यासाठी तर मुळीच नाही”…

रेणुका शहाणे यांचं हे मत ऐकून अनेकांना प्रश्न पडला आहे की त्या खरंच नास्तिक आहेत का. कारण अणू, रेणू सगळीकडे त्या देव आहेत असं मानतात मग स्वतःला नास्तिक का म्हणवता या गोष्टी न पटण्यासारख्या आहेत. त्यांच्या या नास्तिकच्या व्याख्येमुळेच प्रेक्षक त्यांना ट्रोल करत आहेत. एकीकडे देवाचं अस्तित्वही मानायचं आणि दुसरीकडे मी देव मानत नाही असंही म्हणायचं त्यामुळे त्या स्वतःच याबाबतीत गोंधळलेल्या दिसत आहेत.