९० च्या दशकानंतर लक्ष्याची ही नायिका इंडस्ट्रीतून गायब झाली ती कायमचीच… चित्रपट सृष्टीला रामराम ठोकून चक्क आयटी कंपनीत मोठ्या

चित्रपट सृष्टीत सर्वानाच यश मिळतं असं नाही पण काही असेही कलाकार आहेत जे प्रसिद्धीच्या झोतात येऊनही आपल्या आवडत्या क्षेत्रात गेलेल्या पाहायला मिळतात. अशीच एक सुप्रसिद्ध नायिका होती जिने अनेक चित्रपट साकारलेले विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिने अनेक चित्रपटांत आणि नाटकांत देखील कामे केली होती. पण काहीच वर्षात ही अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब झाली ती कायमचीच. आज अशाच एका विस्मृतीत गेलेल्या नायिकेची ओळख करून घेऊ.
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडगोळीने मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला. जिथे लावणीप्रधान चित्रपटांना फाटा देत या कलाकारांनी त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे, निवेदिता सराफ या अभिनेत्रींनी त्यांना चांगली साथही दिली. अशाच एका चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे सोबत एक मॉडर्न नायिका झळकली. ही नायिका प्रत्येक चित्रपटात तिची ओळख फक्त ‘तेजश्री’ या नावानेच देऊ लागली. १९८६ साली कमलाकर तोरणे निर्मित आणि दिग्दर्शित ‘आम्ही दोघं राजा राणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची नायिका होती तेजश्री. त्यांच्यावर चित्रित झालेलं ‘मी प्रेम नगरचा राजा…’ हे गाणं आजही रसिक प्रेक्षकांना चांगलंच स्मरणात राहीलं असेल.

घारे डोळे, मॉडर्न कपडे यामुळे ही नायिका त्यावेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसली. या चित्रपटानंतर तेजश्रीने “शुभ बोल नाऱ्या” या आणखी एका चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे सोबत सहाय्यक म्हणून काम केले. “फेका फेकी” आणि “मज्जाच मज्जा” या २ चित्रपटातून तिने विरोधी भूमिकाही साकारली. या अभिनेत्रीच नाव आहे “अबोली साठे”. पुण्यातील भरत नाट्य मंदिरा जवळ हीच स्वतःच ब्युटी पार्लर देखील होत. आपला पार्लरचा व्यवसाय सांभाळत ती चित्रपट आणि नाटकात देखील काम करायची. पण पुढे लग्नानंतर तिने चित्रपट सृष्टीला रामराम ठोकून आयटी क्षेत्रात मोठ्या हुद्यावर काम देखील केलं. अगदी २०१६ साली देखील त्या एका मोठ्या आयटी कंपनीत कार्यरत होत्या असं जाणकार सांगतात.