२०२१ च्या बिग बॉस रनर अप ठरलेल्या अभिनेत्रीने ६ वर्षाच्या संसारानंतर घेतला घटस्फोट … नुकतंच मोठ्या थाटात केलं दुसरं लग्न

मनोरंजन विश्वात दुसरं लग्न ही आता सर्वसामान्य गोष्ट समजली जाते. अशातच आता २०२१ च्या बिग बॉसची रनर अप आणि अनेक तमिळ रिऍलिटी शो गाजवणारी अभिनेत्री प्रियांका देशपांडे काल १६ एप्रिल रोजी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. प्रियंका देशपांडे ही तमिळ सृष्टीत सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिला तमिळ टेलिव्हिजन सृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे. डीजे वासी सची यांच्यासोबत काल १६ एप्रिल रोजी ती विवाहबद्ध झाली. डीजे वासी सची हेही संगीत आणि मनोरंजन क्षेत्रात एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे.
सची हे यशस्वी डीजे असून ‘क्लीक १८७’ नावाने त्यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. प्रियांका देशपांडे ही मूळची महाराष्ट्रीयन पण तिचे आईवडील कामानिमित्त दक्षिणेत राहायला गेले. लहानपणीच वडिलांचं छत्र हरवल्याने प्रियांकाचे बालपण अतिशय खडतर गेले. पण पुढे तमिळ टेलिव्हिजन क्षेत्रात तिने स्वतःची ओळख बनवली. गायिका, चित्रसंचालिका, निवेदिका, तमिळ बिग बॉस , वेगवेगळ्या रिऍलिटी शोमध्ये तिने सहभाग दर्शवला आहे. वासी सची सोबत तिची एका कार्यक्रमात ओळख झाली होती. या ओळखीचे प्रेमात आणि आता लग्नात रूपांतर झालं आहे.

प्रियांका देशपांडे हिच हे दुसरं लग्न आहे. याअगोदर २०१६ मध्ये तिने प्रवीण कुमार सोबत पगण केले होते. पण ६ वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. तमिळ बिग बॉसच्या सिजन ५ मध्ये तिने मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्याचवेळी ती प्रवीण पासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. सुपर सिंगर, सुपर सिंगर ज्युनिअर, कॉमेडी राजा कलाक्कल राणी, द वॉल, बिग बॉस असे अनेक रिऍलिटी शो प्रियांकाने होस्ट केले आहेत. तर स्पर्धक म्हणूनही तिने हे शो गाजवले आहेत. त्याचमुळे तमिळ सृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा अशी प्रियांका देशपांडे हिची ओळख आहे.