‘खूप विचार करूनच आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे’ लग्नाच्या ९ वर्षानंतर नवऱ्याने मराठी अभिनेत्रीला दिला घटस्फोट

गेल्या काही दिवसांत मनोरंजन विश्वात घटस्फोटाच्या बातम्या पसरू लागल्या आहेत. अशातच आता हिंदी मालिका गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री मुग्धा चाफेकर हिच्या घटस्फोटाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. मुग्धाचा नवरा अभिनेता रविश देसाई याने इन्स्टाग्रामवर या निर्णयाबद्दल खुलासा केला आहे. “खूप विचार आणि चिंतनानंतर, मुग्धा आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचे मार्ग अवलंबले. आता एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे.

आम्ही प्रेम, मैत्री आणि आदराचा एक सुंदर प्रवास एकत्र केला आहे आणि तो आयुष्यभर चालू राहील.” असे रविशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. रविश आणि मुग्धा चाफेकर यांनी डिसेंबर २०१६ मध्ये लग्न केले होते. आता ९ वर्षानंतर त्यांचा सुखी संसार घटस्फोटाच्या बातमीने कोलमडला आहे. मुग्धाबद्दल सांगायचं झालं तर तिने २००१ साली ज्युनिअर जी मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. गुलमोहर, जेता, रूपनगर के चिते अशा मराठी मालिका चित्रपटात ती झळकली होती. गुलमोहर या झी युवा वरील मालिकेत तिने कालिंदीची भूमिका साकारली होती.

भाग्य लक्ष्मी, कुंडली भाग्य, मेरे घर आई एक नन्ही परी अशा हिंदी मालिकांमधून तिने लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेच्या सेटवर एकत्रित काम करत असताना रविश देसाई सोबत तिचे प्रेम जुळले आणि २०१६ मध्ये त्यांनी थाटात लग्नही केले. पण आता लग्नाच्या ९ वर्षानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय दोघांनाही मान्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे. या निर्णयावर उलट सुलट चर्चा नको असेही रविशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.