“लोकांची मानसिकता तीच आहे ती बदलणार नाही” लहानपणी माझ्या उंचीवरूनही लोक….संतोष जुवेकरसाठी अंकुर आला धावून

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता संतोष जुवेकर चांगलाच ट्रोल होत असल्याचे पाहून आता मराठी इंडस्ट्रीने त्याच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली आहे. चला हवा येऊ द्या मधील अंकुर वाढावे याचीही ही पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. “२९९ रुपयांमध्ये 2GB Data आपल्याला मिळतो म्हणून आपण जग हातात घेउन फिरतो. पण त्याचा उपयोग कसा करायचा हे मात्र आपण अजुन शिकलो नाही. एक तर कुठल्याही अभिनेत्याच आयुष्य हे जरा किचकटच असतं कारण, आपल्याला हवं तसं काम मिळत नाही, मिळालं तर त्यातुन आपलं घर कसं वाचायचं यापासून तर अनेक गोष्टी डोक्यात असतात बरं हे क्षेत्र आम्ही स्वतः निवडलं असतं त्यामुळे याचा आम्ही कोणावरही दोष देत नाही.

गेल्या काही दिवसापासून संतोष जुवेकर हे ज्याप्रमाणे ट्रोल होत आहेत आणि त्या नंतर लगेच दुसरा विषय म्हणजे कुणाल कामरा! त्याने त्याच मत मांडल. संतोष जुवेकर आणि मी तसे एकमेकांच्या एवढे जवळचे नाही पण एकाच क्षेत्रात काम करतो म्हणून आम्ही एकमेकांना ओळखतो. कुशल दादाचे ते चांगले मित्र म्हणून त्यांच्या काही गोष्टी कळल्यावर मी जरा चकित झालो जसे एकतारा त्यावेळी त्यांनी संगीत शिकायला घेतलं पात्र खरं वाटावं म्हणून खूप सारे वाद्य विकत घेतले शिकण्यासाठी पण आपल्याच मराठी प्रेक्षकांमुळे तो चित्रपट आपटला, हेच काय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अगदी जवळचा आणि अभिनेता म्हणून आपल्याला सिद्ध करण्यासाठी केलेला चित्रपट विदुषक कमाल चित्रपट अप्रतिम काम पण तोही आपटला कारण प्रेक्षकांना त्यांना असं पाहण्याची सवय नव्हती. असो तर विषय संतोष जुवेकर! त्या इंटरव्ह्यू मधे जे काही बोलले त्याबद्दल जास्त बोलणार नाही त्यावर खूप लोकं आपापल्या पद्धतीने बोलले! त्यानंतर लोकांनी जे त्यांना धारेवर धरलं त्यावर खूप दिवसापासून बोलायचे होते, आज बोलतोच! तर मारवल चा बॅड मॅन सगळ्यांनी बघितला असेलच त्यातला जोकर (हीथ लिजेर) बॅड मॅन पेक्षाही लोकांना जास्त आवडला त्याने त्या पत्रा साठी स्वतःला एक वर्ष म्हणे डांबून घेतलं होत, चित्रपटाच्या स्क्रिनिंग च्या वेळी स्वतः सांगितल ह्या साठी मला ऑस्कर मिळेल पण मी ते घ्यायला मी नसेन आणि झालंही

तसंच त्याने कारण पात्र खरं वाटण्यासाठी जे काही त्याने केलं त्यातून तो बाहेर येऊ शकला नाही आणि त्याने आयुष्य संपवून घेतलं (ऐकिव महिनुसार). जुवेकर म्हणाले अक्षय खन्ना ला मी बोललो नाही ही खरं तर स्थानालावस्की ची ॲक्टिंग method आहे जी जगातले वास्तववादी अभिनेते जे आपल्याला आवडतात त्यातले जवळ्पास सगळे ही method वापरतात त्यानेही कदाचित वापरली असेल हरकत नाही. दुसरं स्टेटमेंट बद्दल मलाही हसायला आलं पण त्यावरून एवढं ट्रोल करण जरा मला खटलकल कारण त्यावरून त्याला होणारा मानसिक त्रास हे त्यालाच माहीत! Juvekar Santosh संतोष दादा लोकांना काहीही म्हणू दे पण तुम्ही खंबीर राहा, धीर धरा याचा त्रास करून घेऊ नका आणि आपलं काम करात राहा! लहानपनी माझ्या उंचिवरून चिडवणारे आणि आताही, लोकांची मानसिकता तिच आहे ते बदलणार नाही! -अंकुर रंजनाबाई विठ्ठलराव वाढवे यावरही बोलायला मागे राहणार नाहित.”