मी २०२३ मध्ये विनोद कांबळीला घटस्फोट देण्याचा विचार केला होता पण… दुसरी पत्नी एन्ड्रीया हिने सांगितली त्यावेळची हकीकत

विनोद गणपत कांबळी आत्ताच्या पिढीला कदाचित माहित नसेल पण क्रिकेट विश्वात एक काळ त्याने गाजवला होता. नुकताच तो आजारातून बरा झाल्यावर विनोद कांबळी यांनी दिलेल्या मुलाखतीत पत्नी अँड्रियाबाबत मोकळेपणाने बोललेला पाहायला मिळाला. या कठीण काळात पत्नीने दिलेली साथ किती मोलाची होती हे तो बोलायला अजिबात विसरला नाही. विनोदच्या मुलाखतीनंतर आता अँड्रियाची मुलाखत देखील चर्चेचा विषय ठरली आहे.

ह्या मुलाखतीत अँड्रियाने विनोद कांबळी आणि तिच्या नात्याबद्दल बरच काही म्हटलं आहे ती म्हणते ” मी २०२३ मध्ये विनोद कांबळीला घटस्फोट देण्याचा विचार केला होता पण आता मला पुन्हा त्यावर विचार करावा लागतोय. मला वाटतं की मी त्याला सोडले तर तो असहाय्य होईल. तो अगदी एका लहान मुलासारखा आहे आणि ते पाहून मला त्रास होतोय. त्यामुळे मला त्याची काळजी वाटते. मी एका चांगल्या मित्राला सोडू शकत नाही.” विनोद कांबळीची अवस्था पाहून त्याची दुसरी पत्नी एन्ड्रीया हिने तिचा घटस्फोटाचा निर्णय बदलला आहे.”

आजही विनोद कांबळी ह्याचे अनेक चाहते त्याच्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना आणि प्रोत्साहन देताना ते पाहायला मिळतात. त्यात आता पत्नीने देखील त्याच्या उज्वल भविष्यासाठी त्याची भक्कम साथ देणार असल्याचं म्हटलं आहे.