बालक-पालक, टकाटक, टाइमपास आणि टाइमपास २ मध्ये मुख्य पात्राची भूमिका साकारणारा अभिनेता प्रथमेश परब सध्या ताजा खबर या हिंदी वेबसिरीज मधून झळकताना पाहायला मिळाला, आता ह्या वेब सिरीजचे पुढचे काही भाग देखील येतील याची उत्सुकता सर्वानाच लागून आहे. पण आता चर्चा आहे ती त्याच्या घरावच्या नेम प्लेटची. नुकताच एक व्हिडिओ शेअर करत त्याने आपल्या घराची पाटी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
घराच्या पाटीचा व्हिडिओ शेअर करताना प्रथमेश म्हणतो “अशी ही बनवाबनवी या चित्रपटावर, त्यातील प्रत्येक पात्रावर आणि प्रत्येक dialogue वर भरभरून प्रेम करणाऱ्या अनेकांपैकी आम्हीही एक!❤️❤️🤗🤗
यातील dialogue पासून प्रेरणा घेऊन, ही सुंदर name plate, @sarvashree_creation यांनी तयार केली. It feels like, perfect gift for #अशीहीबनवाबनवी lover❤️🤗 त्यासोबत अष्टविनायक असलेले हे सुंदर fridge magnet सुद्धा❤️
Thank you for this beautiful and stunning gift❤️🫶
Do check @sarvashree_creation for more such amazing stuff❤️