किती आहे अशोक सराफ यांची संपत्ती? सुरवातीचा काळ खूपच खडतर होता बँकेत काम केल्यानंतर महिन्याला २३५ रुपये मिळायचे त्यातून
अशोक सराफ यांनी लहान असल्यापासूनच रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. अगदी सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभागी होऊन आपल्याला जे येतं ते लोकांसमोर सादर करायचे. ययाती आणि देवयानी हे पहिलं व्यावसायिक नाटक त्यांनी साकारलं यात त्यांनी साकारलेली विदूषकाची भूमिका तुफान लोकप्रिय ठरली. नाटकातून पुरेसे पैसे मिळत नसल्याने घरखर्चाला हातभार लागावा म्हणून त्यांनी ही नोकरी स्वीकारली होती. अशोक सराफ यांना त्यावेळी बँकेत काम केल्यानंतर २३५ रुपये महिन्याला पगार मिळायचा. २३५ रुपये पगारातून ते घर खर्चासाठी २०० रुपये द्यायचे. उरलेले ३५ रुपये ते स्वतःसाठी ठेवायचे. या ३५ रुपयातून चित्रपट पाहण्याची आवड जोपासायचे. राहिलेल्या पैशातूनच एक वेळचे जेवण असा महिन्याचा खर्च ते भागवायचे. बँकेच्या जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये त्यावेळी १० पैशात पाव आणि १५ पैशात पातळ भाजी मिळायची. एवढ्या पैशातच ते आपलं दुपारचं जेवण करायचे.
ज्यावेळी नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात निवेदिता आणि अशोक एकत्रित काम करत होते त्यावेळी निवेदिता जोशी अशोक सराफ यांच्या अभिनयावर खूपच भाळल्या होत्या. तेव्हापासून निवेदिता यांना अशोक सराफ आवडू लागले होते. पण निवेदिताच्या घरच्यांना तिने कलाकारांशी लग्न करू नये असं मत होत. शेवटी घरच्यांचा विरोध डावलून स्वतः निवेदितानेच अशोक सराफ यांना लग्नाची मागणी घातली होती. निवेदिता यांची थोरली बहीण डॉ मीनल परांजपे हिच्या पुढाकाराने शेवटी या लग्नाला घरच्यांकडून परवानगी मिळाली. मुंबईत थाटामाटात लग्न करता येत असूनही अशोक सराफ आणि निवेदिता यांनी आपले लग्न गोव्यातील मंगेशी मंदिरात अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. इतके मोठे कलाकार असूनही आजही दोघांचे पाय जमिनीवर घट्ट रोवून आहेत. अनेकांना उत्सुकता असते कि ह्या दोघांची संपत्ती किती असेल? तर एका प्रसिद्ध मीडिया पोर्टलनुसार, अशोक सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास ४२ कोटी रुपये इतकी आहे. इतकी संपत्ती असूनही कशाचाही गर्व ह्या दोघांनाही नाही सेटवर देखील ते इतर कलाकारांशी अगदी आपुलकीने वागतात सह कलाकारांची विचारपूस करतात.
अशोक सराफ म्हणतात “मी ज्या लोकांनी मदत केली त्यांना मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. माझ्या कुटुंबियांकडून या २० ज्येष्ठ कलाकारांना दिलेली ही छोटीशी भेट आहे. यामुळे या रंगकर्मींना मदत झाली तर मला आनंदच आहे. माझी बायको निवेदिताची ही सगळी कल्पना असून मी सुरुवातीला एवढ्या गोष्टी जुळून येतील की नाही म्हणून घाबरलो होतो परंतु, हे सगळे लोक आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले त्यामुळेच हे शक्य झालं”. अशोक सराफांनी पैशाला कायमच दुय्यम स्थान दिल. आधी काम मिळवायचं त्यात स्वतःला झोकून द्यायचं मेहनत करायची मग पैसा आपोआप आपल्या मागे येतो.