news

वयाच्या १७ व्या वर्षी मराठी मालिका गाजवली…पण आता कपड्यांमुळे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ट्रोल

मराठी सेलिब्रिटी बॉलिवूडचं अनुकरण करतात असं म्हटलं जातं. अर्थात त्यांच्या तोकड्या कपड्यांमुळे त्या नेहमी ट्रोल होतच असतात. अभिनेत्री मिताली मयेकर आणि प्रिया बापट यांनाही या गोष्टींवरून ट्रोल करण्यात आलं होतं. त्यात आता नुकत्याच केलेल्या पोस्टवरून एका अभिनेत्रीला ट्रोल व्हावं लागलं आहे. २०१९ मध्ये कलर्स मराठीवर प्रसारित झालेली ‘जीव झाला येडा पिसा’ ही मालिका तुम्हाला आठवत असेलच. या मालिकेची नायिका म्हणजेच अभिनेत्री विदुला चौगुले ही सध्या तिचा क्वालिटी टाइम एन्जॉय करताना दिसत आहे.

actress vidula chaugule photos
actress vidula chaugule photos

व्हिएतनाम येथिल हा लॉंग खाडीत ती तिच्या मित्र मैत्रिणींसोबत या ट्रिपचा आनंद घेत आहे. अर्थात समुद्र असल्याने विदुलाने स्वीमसुट घातलेला पाहायला मिळतो आहे. या पर्यटन स्थळाचे काही व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण हे तिचे स्वीम सूटमधले व्हिडीओ पाहून चाहत्यांनी मात्र तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. विदुला चौगुले ही मूळची कोल्हापूरची आहे. वयाच्या १७ व्या वर्षीच तिला जीव झाला येडा पिसा या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. मालिकेनंतर विदुला छोट्या पडद्यावर पाहायला मिळाली नाही पण तिने बॉईज ३ चित्रपटात बोल्ड भूमिका साकारलेली पाहायला मिळाली होती.

एक मालिका आणि मोजके चित्रपट केल्यानंतर विदुला या पोस्टमुळे चांगलीच ट्रोल होत आहे. पण काही चाहत्यांना तिचा हा अंदाज आवडला आहे. मराठी अभिनेत्री स्वीमसूटमधले फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात. अर्थात स्विमिंग करताना स्वीमसूट घालून नाही मग काय पूर्ण ड्रेस घालुन करायचं का ? असाही प्रश्न कलाकारांच्या बाजूने चाहते मांडताना दिसत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button