news

प्रसिद्ध अभिनेत्याच्या केळवणाला सुरुवात…लग्नाची तारीख केली जाहीर

मराठी मालिका सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शाल्व किंजवडेकर लवकरच लग्नबांधनात अडकणार आहे. नुकतेच त्याच्या केळवणाला सुरुवात झालेली पहायला मिळत आहे. काल शनीवारी शाल्वच्या जवळच्या मित्र मंडळींनी श्रेया आणि शाल्वचे पहिले केळवण थाटात साजरे केले. यावेळी त्या दोघांनीही लग्नाची तारीखही जाहीर केलेली पाहायला मिळाली. वन मंथ टू गो असे म्हणत हे दोघेही आता येत्या ९ डिसेंबरला लग्न करणार असल्याचे सांगितले आहे.

shalva kinjawadekar wedding kelvan photos
shalva kinjawadekar wedding kelvan photos

शाल्व आणि श्रेया दोघेही कॉलेजपासूनचे मित्र आहेत. श्रेया दफळापूरकर ही फॅशन डिझायनर असून ‘हाऊस ऑफ तक्षी’, ‘ तलम’ या कपड्यांचा ब्रँडची मालकीण आहे. श्रेयाने काही मराठी प्रोजेक्टसाठी कॉस्टयुम डिझायनर म्हणूनही काम केलेले आहे. अभिनेता शाल्व किंजवडेकर याने त्याच्या पहिल्याच मराठी मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. झी मराठीच्या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे त्याला चांगली लोकप्रियता मिळाली होती. एक बालकलाकार ते मराठी मालिकेचा नायक अशी त्याने ओळख बनवलेली आहे. गेल्या वर्षी शाल्वने श्रेयासोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला होता. त्यानंतर बरेच दिवस तो कुठल्या प्रोजेक्टमध्ये दिसला नाही.

shalva kinjawdekar and shreya daflapurkar wedding engagement photos
shalva kinjawdekar and shreya daflapurkar wedding engagement photos

पण झी मराठीने त्याला शिवा मालिकेतून पुन्हा एकदा अभिनयाची संधी मिळवून दिली. मालिकेत तो आशुची भूमिका साकारत असून या भूमिकेवरही प्रेक्षकांनी प्रेम दाखवलं आहे. दरम्यान आता पुढच्या महिन्यात पार पडत असलेल्या लग्न सोहळ्यामुळे शाल्व किंजवडेकरला मालिकेतून ब्रेक घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याचं हे लग्न पाहण्यासाठी चाहतेही तेवढेच उत्सुक असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button