२०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. याचजोडीला चित्रपटाच्या कलाकारांनीही या सृष्टीत चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. नायकाचा मित्र सल्या हे पात्र तुम्हाला नक्कीच आठवत असेल. ही भूमिका निभावली होती अरबाज शेख याने. या चित्रपटानंतर अरबाजचे अनेक चित्रपटातून काम केले. यारी, संघर्ष योद्धा जरांगे पाटील, मुसंडी, घर बंदूक बिरयानी, झुंड, एकदम कडक अशा अनेक चित्रपटातून तो सहाय्यक भूमिकेत दिसला.
काही महिन्यांपूर्वी अरबाजचे व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकून पुण्यातील वडगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट जवळ ‘बेक बडीज’ या नावाने केक आणि कॅफे सुरू केला. पण आता याच अरबाजचे त्याच्या गर्लफ्रेंड सोबत दिवाळी साजरी केलेली पाहायला मिळत आहे. अरबाज गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सिमरनच्या प्रेमात आहे. दोघेही अनेकदा एकत्रित पाहायला मिळाले होते. सिमरन पुण्यातच वास्तव्यास असल्याने अरबाजचा यशस्वी प्रवास तिने जवळून अनुभवला आहे. सोशल मीडियावर प्रेमाची जाहीरपणे कबुली देणारे हे कपल आता लवकरच विवाहबद्ध होतील अशी आशा आहे. दरम्यान सैराट चित्रपटाने अरबाजला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती.
नागराज मंजुळे यांच्या अनेक चित्रपटातून त्याला चांगले काम मिळत गेले. मिळालेल्या पैशांचा सदुपयोग करून अरबाजने व्यवसाय उभारला. गरिबीची झळ सोसलेल्या या कलाकाराला आर्थिक दृष्ट्या स्थिरता मिळवून देण्याचे काम नागराज मंजुळे यांनी केले. तानाजी गळगुंडे यांच्याही बाबतीत त्यांनी असंच सहकार्य केलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे रिलेशनशिप मध्ये असलेल्या अरबाज आणि तानाजीच्या लग्नाचा बार लवकरच उडालेला पाहायला मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे.