महेश कोठारे यांच्या आलिशान घराची झलक… घराचं सर्व डेकोरेशन महेश कोठारे यांच्या पत्नी नीलिमा यांनी केल
मराठी चित्रपट एकामागून एक सुपरहिट चित्रपट देत असताना आणि सर्वकाही सुरळीत चालू असताना अचानक हिंदी चित्रपटात पदार्पण करण्याचा महेश कोठारे यांचा अट्टाहास नडला. “लो मे आ गया” हा त्यांचा चित्रपट बॉक्सऑफिसावर सफशेल पडला. त्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानामुळे महेश कोठारे यांच्या राहत्या घरावर जप्ती आली होती. पण त्यानंतर स्वतःला सावरत त्यांनी यशाचा एकेक पल्ला गाठला. पुन्हा नव्याने सुरवात करत त्यांनी पुन्हा यश संपादन केले. चाहत्यांना आपला आवडता अभिनेता कुठे राहतात त्यांचं घर कस आहे ह्याची उत्सुकता लागून असले. आज महेश कोठारे यांच्या चाहत्यांसाठी त्यांचा घराची हि खास झलक.
महेश कोठारे यांचा कांदिवली येथील ठाकूर व्हिलेज मध्ये आलिशान फ्लॅट आहे. या घराची एक खास झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. महेश कोठारे यांच्या घरात प्रवेश करताच एक देवघर पाहायला मिळेल जे त्यांच्या आई जेनमा कोठारे यांनी सजवलेलं आहे. घराचं सर्व डेकोरेशन महेश कोठारे यांच्या पत्नी नीलिमा यांनी केलेलं आहे. हॉलमध्ये प्रशस्त बैठक व्यवस्था असून एका कपाटात महेश कोठारे यांना मिळालेले पुरस्कार सजवण्यात आले आहेत. मुंबईत सहसा मोकळी जागा फारशी पहायला मिळत नाही.
त्याचमुळे महेश कोठारे यांनी त्यांच्या घराला एक मोकळी आणि प्रशस्त असं टेरेस गार्डन बनवलं आहे. या मोकळ्या जागेत छोटीशी बागही पाहायला मिळते. आंब्याच्या सिजनमध्ये इथल्या कुंडीतील झाडाला आंबेही लागतात. गार्डन एरियाला जोडूनच एक प्रशस्त मोकळा हॉल आहे जिथे बर्थडे पार्टी, ३१ डिसेंबर साजरं केलं जातं. आदिनाथला टीव्ही बघायला आवडत नाही म्हणून पुस्तकांसाठी एक खास जागा त्याने बनवून घेतली आहे. आपल्या या मराठमोळ्या कलाकाराचं घर तुम्हाला कसं वाटलं.