लिंबू कलरची साडी म्हटलं की अश्विनी भावेंची ओळख सांगितली जाते. मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीतही त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अश्विनींने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन तिने आपल्या करियला सुरुवात केली. त्यानंतर तिने ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज‘, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारखे चित्रपट केले.
मराठीच नाही तर अनेक बॉलीवूड चित्रपटांत ती झळकली. ऋषी कपूर, जॉकी श्रॉफ, अक्षय कुमार, ओम पुरी, इरफान खान, सलमान खान अश्या अनेक बॉलीवूड दिग्गज कलाकारांसोबत अश्विनी भावे हि प्रमुख भूमिकेत झळकली. २००७ साली सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या किशोर बापर्डीकरसोबत लग्न केल्यानंतर अश्विनी भावे त्यांच्या कुटुंबासोबत अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहायला गेल्या. समीर आणि साची अशी दोन अपत्ये त्यांना आहेत. त्यांच्या परदेशातल्या या घराची भुरळ मराठी सेलिब्रिटींनाही पडते. कारण बरेचसे मोठमोठे सेलिब्रिटी जेव्हा कधी तिथे जातात तेव्हा ते अश्विनी भावे यांच्या घराला आवर्जून भेट देतात.
अश्विनी भावे यांना गार्डनिंगची आवड आहे. घराच्या पाठीमागे एक भलीमोठी बाग त्यांनी सजवली आहे. स्थानिक भाज्या, फळं, ब्लॅक बेरी, चेरी, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली या सर्वांची ते या गार्डनमध्ये जोपासना करतात. सुनील बर्वे, सचिन खेडेकर, चंद्रकांत कुलकर्णी, अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी यांनी त्यांच्या या बागेतल्या फळांची चव चाखली आहे. मराठी सृष्टी गाजवलेल्या कलाकाराचं हे परदेशातलं आलिशान घर पाहून तुम्हाला कसं वाटलं…