news

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापचा थाटात पार पडला लग्नसोहळा… सेलिब्रिटींनी लावली खास उपस्थिती

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेला पृथ्वीक प्रताप आज शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी विवाहबंधनात अडकला आहे. पृथ्वीकने त्याच्या लग्नाचे खास फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे. कुठलाही गाजावाजा न करता अतिशय गुपचूप रित्या हे लग्न पार पडल्याने सगळ्यांना त्याच्या लग्नाच्या बातमीने आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आहे. पृथ्वीक प्रतापने कोणाशी लग्न केलंय हे मात्र त्याने अजूनही गुलदस्त्यात ठेवलं आहे. पण लग्नाचे फोटो पाहून परफेक्ट जोडी अशा शब्दांत त्याच्या पत्नीचं कौतुक होत आहे.

pruthvik pratap wedding photos
pruthvik pratap wedding photos

महाराष्ट्राची हास्यजत्रा व्यतिरिक्त पृथ्वीकने मालिका, चित्रपटातून काम केलं आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्याला हास्यजत्राने वेगळी ओळख मिळवून दिली. शाहरुख खान बनायचं ही स्वप्न घेऊन मराठी इंडस्ट्रीत दाखल झालेल्या पृथ्वीकला स्ट्रगल अजिबात चुकलेला नाही. यशाचा एक एक टप्पा सर करत असताना गेल्या वर्षी पृथ्वीकने नवीन घरात गृहप्रवेश केला होता. त्यात आता त्याच्या लग्नाची बातमी समोर आल्याने आयुष्याचा आणखी एक टप्पा त्याने सर केलेला पाहायला मिळतो आहे.

prithvik pratap wedding photos
prithvik pratap wedding photos

सफेद रंगाचा धोती कुर्ता आणि ऑफ व्हाइट रंगांच्या साडीमध्ये हे नवविवाहित दाम्पत्य अगदी खुलून दिसत होते. हे लग्न कुठे आणि कसं पार पडलं याबद्दल जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे या लग्नाच्या गोष्टीचा उलगडा तो लवकरच करेल अशी आशा आहे. तूर्तास या नवविवाहित दाम्पत्यास आमच्या समूहाकडून खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button