marathi tadka

छोट्या सिम्बाचा अफलातून डान्सचा व्हिडीओ पाहिलात का….नेटकऱ्यांनी केलं कौतुक

आमच्या पप्पाने गणपती आणला या गाण्यावरील रील मुळे साईराज केंद्रे हा चिमुरडा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. याच गाण्यामुळे साईराजचे मालिका सृष्टीतही पादर्पण झाले. अप्पी आमची कलेक्टर ही झी मराठीची मालिका लोक साईराज च्या एंट्रीमुळेच पाहू लागले अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहे. साईराजने त्याच्या निरागस अभिनयाने मालिकेचा घसरलेला टीआरपी वर आणला. अल्पावधीतच हा चिमुरडा अभिनयाचे कुठलेही धडे न गिरवता फक्त चेहऱ्यावरील निरागस हावभावाने लोकांच्या मनात जागा करून गेला. अप्पी आमची कलेक्टर मालिकेत त्याने साकारलेली सिंबाची भूमिका लोकप्रिय ठरली आहे. सोशल मीडियावर साईराजचे खूप फॉलोअर्स आहेत.

मालिका आणि रिल्सच्या माध्यमातून तो नेहमी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. पण वेदांती सोबतचा त्याचा एक व्हिडिओ खूप लोकप्रिय ठरत आहे. वेदांती भोसले ही चिमुरडी सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली आहे. नुकतेच तिने ड्रामा ज्युनिअर्समध्येही प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले पाहायला मिळाले होते. अमृता खानविलकरची तर ती नेहमी परीक्षा घेताना दिसत होती. तिचं हे चुरचुरीत आणि ठसकेबाज बोलणं प्रेक्षकांनाही भावलं होतं. साईराज आणि वेदांतीची ओळख झी मराठी मुळेच झाली असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या दोघांनी एकत्र काळी बिंदी या गाण्यावर एक रील बनवलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय ठरला आहे. अवघ्या दोन तीन दिवसातच या व्हिडिओला ५६ हजारांहून अधिक व्युव्ह्ज मिळाले असून सेलिब्रिटींनाही त्यांच्या या रीलची भुरळ पडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button