news

मला दातांवरून,दिसण्यावरून खूप ट्रोल केलं अगदी माझं लग्न जुळवण्यावेळीही …अभिनेता संदीप पाठकने असं केलं लोकांना आपलंस

अभिनेता म्हटलं की त्याला रंगरूप असावं असा एक समज जनमानसात पसरला आहे. पण मराठी इंडस्ट्रीसाठी या गोष्टी गौण मानल्या जातात. मराठीत फक्त तुमच्या अभिनयाची कसब पाहिली जाते, त्यामुळे देखणं रूप नसूनही मराठीत अनेक कलाकार सुपरस्टार बनले आहेत. अभिनेता संदीप पाठक यानेही त्याच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट, नाटकातून लोकप्रियता मिळवली आहे. लक्ष्मण देशपांडे यांचं ‘वऱ्हाड निघालं लंडनला ‘ हे नाटक साकारण्याचं त्याने शिवधनुष्य पेललं आणि ते यशस्वी ठरलं. ईडक, रंगा पतंगा, आल्याड पल्याड, श्यामची आई अशा अनेक चित्रपटातून संदीपने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. पण कधीकाळी संदीपला त्याच्या दिसण्यावरून खूप ट्रोल केलं होतं.

prashant damle and sandeep pathak
prashant damle and sandeep pathak

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून मुंबईत आलेल्या संदीपला कधी वाटलंही नव्हतं की आपण अभिनय क्षेत्रात येऊ. आईवडील दोघेही शिक्षक त्यामुळे आपण कुठल्यातरी विषयाचा शिक्षक व्हावं, अभिनयाचा शिक्षक व्हावं असं त्याचं स्वप्न होतं. पण पुढे औरंगाबाद आणि नंतर पुण्यात आल्यानंतर तो नाटकाशी जोडला गेला. सखाराम बाईंडर या नाटकात त्याला सखारामची भूमिका मिळाली आणि त्याने ही भूमिका गाजवली. पण अभिनय क्षेत्रात जम बसवण्यासाठी त्याला मोठा स्ट्रगल करावा लागला. वडिलांना कॅन्सर झाल्याने डोक्यावर ९ लाखांचं कर्ज होतं त्यामुळे मुंबईत एका छोट्याशा खोलीत राहून तो नाटकातून मिळेल ते काम करू लागला. याचदरम्यान रूम मालक ९ नंतर लाईट बंद करायचा म्हणून मग कुर्ल्याच्या नेहरू पार्कमध्ये असलेल्या एलईडीच्या उजेडात पुस्तकं वाचायचा. रंगरूपावरून अनेक भूमिका हातातून गेल्या तर कधी ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण संदीपने हे ट्रोलिंग कधीच गंभिरतेने घेतलं नाही. उलट याबद्दल तो म्हणतो की, “मला माझ्या दातांवरून, दिसण्यावरून खूप ट्रोल केलं.

sandeep pathak family photos
sandeep pathak family photos

अगदी माझं लग्न जुळवण्यावेळीही मला घरच्यांनी लवकर समोर आणलं नव्हतं. मी गंमतीने कधी म्हणतो की, माझी आत्मकथा लिहायचं ठरवलं तर त्याला मी ‘अभिनयाची दंतकथा’ असं नाव देऊ शकतो. पण ट्रोलिंगला मी आता इग्नोर करतो. ट्रोलिंगवर विचार करत बसलो तर मी माझं काम कधी करणार?. माझे दात पुढं आहेत म्हणून न्यूनगंड बाळगण्यापेक्षा आहे ते स्वीकारून त्यातून भूमिका कशी खुलवता येईल ते बघायला शिकलो. ओम पुरीच्या चेहऱ्यावर खड्डे आहेत म्हणून त्यांनी न्यूनगंड न बाळगता स्वतःची ओळख बनवली. आपले दात पुढं आहेत ना! मग एक गोड स्माईल करून मी लोकांना आपलंसं केलं. थिएटर करून आलेला माणूस याबाबत कधीच न्यूनगंड बाळगू शकत नाही. माझा मायनस पॉईंट आहे त्याला झाकता कसं येईल हे मी माझ्या कामातून दाखवणार. संजय नार्वेकरची उंची कमी आहे पण त्याचं देडफुटया कॅरॅक्टर गाजलं. तुमच्या अभिनयाची उंची कशी गाठता येईल यावरच कलाकारांनी भर द्यायला पाहिजे असं मला वाटतं.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button