वयाच्या ६० व्या वर्षी अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण …..नव्या घराचा व्हिडिओ होतोय व्हायरल
मराठी सृष्टीत कलाकारांची घर घेण्याची ईच्छा आता पूर्ण होत आहेत. अशातच लोकप्रिय अभिनेते अविनाश नारकर यांनीही त्यांच्या हक्काचं पहिलं घर खरेदी केलं आहे. अविनाश नारकर ही गेली तीन दशकाहून अधिक काळापासून मराठी इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत. नाटक, चित्रपट मालिका आशा तिन्ही माध्यमातून त्यांनी अभिनयाची छाप सोडली आहे. गेले काही दिवस ते सोशल मीडियावरील डान्स व्हिडीओ मुळेही चर्चेत राहिले होते. पण आता वयाच्या ६० व्या वर्षी हक्काच्या घरावर त्यांचं स्वतःच्या नावाची पाटी लागली आहे.
अविनाश नारकर यांनी नुकतंच फ्लॅट बुक केला आहे या फ्लॅटचा ताबा त्यांना मिळाला असून या घराची झलक ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. “घर…. अविच्या नावावरचं पाहिलं घर!!!सतत दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा विचार !! राहत्या घरावर पण माझंच नाव.!..अगदी घरातल्या ताट – वाटिवर सुध्दा!!! आज खूप छान वाटतंय! तुझी न बाळगलेली सर्व स्वप्न पूर्ण होवोत!!! happy home♥️♥️…तुझी खंबिर साथ… आणि तु घट्ट पकडलेला हात… यापलिकडे खरं तर काहीही नकोय….आणि खरं सांगू… तुझ्या नवापाठोपाठ माझं नाव येतं ही माझ्यासाठी कायम आभाळ ठेंगणं करणारी गोष्ट आहे Babbu…..!! Love & Respect YOU forever….!!” म्हणत ऐश्वर्या नारकर यांनी ही घराची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे दाम्पत्य सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलं आहे. रिल्सच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहिले आहेत. दोघांची पहिली ओळख ही नाटकाच्या माध्यमातून झाली होती. नाटक संपणार पुढे भेट होणार नाही हे लक्षात आल्यानंतर ऐश्वर्या नारकर यांनीच अविनाश यांना प्रपोज केले होते. अमेय हा त्यांचा मुलगा अभिनय क्षेत्रात नशीब आजमावू पाहत आहे. पण सध्या अमेय पुढील शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. त्यामुळे घर घेण्याचा हा आनंदाचा क्षण तो मिस करत आहे.