marathi tadka

तो सीन खूप आव्हानात्मक होता माझ्या पायाला जोरदार मार लागलेला होता पण.. हर्षद अतकरीचा ‘शॉर्ट अँड स्वीट’ च्या शूटिंगचा खास अनुभव

प्रसिद्ध मराठी अभिनेता हर्षद अतकरी, ज्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं, त्याची मेहनत आणि समर्पण याचा अनोखा अनुभव ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. थिएटरमध्ये यश मिळवल्यानंतर, आता हा चित्रपट झी टॉकीजवर प्रेक्षकांसाठी घरी बसल्या पाहायला मिळणार आहे. शूटिंगमधला एक आठवणीतला क्षण शेअर करताना हर्षदने सांगितलं, “फिल्म शूटिंगच्या काळात मी सतत मुंबई आणि बेळगावदरम्यान प्रवास करत होतो. माझा टीव्ही शो सुरू होता आणि फिल्मचं शूटिंगही चालू होतं. दोन्हीकडचं शूटिंग आणि वेळ सांभाळणं खूप ताण देणारं होतं. मी खूप थकलेलो होतो, पण कामाचं प्रेम मला ऊर्जा देत होतं.”

harshad atkari and rasika sunil
harshad atkari and rasika sunil

चित्रपटातील फुटबॉल मॅचच्या सीनमध्ये दिग्दर्शकाला हर्षदकडून बॅकफ्लिप गोल हवा होता. जखमी असतानाही बॉडी डबलने सीन योग्य वाटत नव्हता, म्हणून शेवटी हर्षदने स्वतःच स्टंट करून सीन पूर्ण केला. “तो सीन खूप आव्हानात्मक होता, माझ्या पायाला जोरदार मार लागलेला होता, पण चित्रपटासाठी तो शॉट महत्त्वाचा होता. दिग्दर्शकाने नाही म्हणत असतानाही मी तो शॉट केला,” हर्षद म्हणाला. ‘शॉर्ट अँड स्वीट’ ने हर्षदला संयम आणि चिकाटी शिकवली, आणि हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी खास ठरणार आहे.

Short and Sweet film actors
Short and Sweet film actors

झी टॉकीज बिझनेस हेड बवेश जानवलेकर म्हणाले, “झी टॉकीज नेहमीच प्रेक्षकांसाठी वेगळ्या आणि दर्जेदार कथा सादर करण्याचा प्रयत्न करतो. ‘शॉर्ट अँड स्वीट’ हा चित्रपट एका अनोख्या वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. या वेगळ्या आणि हृदयस्पर्शी नात्याची कथा प्रेक्षकांना नक्कीच भावेल. आमच्या माध्यमातून अशा अनोख्या कथेचे दर्शन घरबसल्या देऊ शकल्याचा आम्हाला आनंद आहे. ‘शॉर्ट अँड स्वीट’ प्रेक्षकांना हास्य, भावना आणि एक वेगळा दृष्टिकोन नक्कीच देईल.” ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपट २७ ऑक्टोबर रोजी झी टॉकीजवर दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता प्रसारित होणार आहे, ज्यात हर्षद अतकरीच्या खास अनुभव त्याच्या चाहत्यांना पाहता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button