या ५ अभिनेत्रींच्या मुली दिसतात त्यांच्या इतक्याच सुंदर…काही सोशल मीडियावर स्टार तर काही अभिनयापासून आहेत दूर
कला क्षेत्र म्हटलं की त्यांची मुलंही त्याच क्षेत्रात नशीब आजमावताना पाहायला मिळतात. पण काही कलाकारांची मुलं याला अपवाद ठरली आहेत. आज अशाच काही स्टार किड्सबद्दल खास गोष्टी जाणून घेऊयात….
अभिनेत्री सुलेखा तळवलकर या गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत काम करत आहेत. स्मिता तळवलकर यांच्या सून म्हणून त्या परिचयाच्या असल्या तरी त्यांनीही या इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख जपली आहे. आर्य आणि टिया ही त्यांची दोन मुलं अभिनय क्षेत्रापासून खूप दूर आहेत. टिया हिने बालकलाकार म्हणून आजीच्या प्रोजेक्टमधून काम केले होते. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या टियाने सौंदर्य स्पर्धाही जिंकली आहे. टियाला कुकिंगची देखील आवड आहे. मात्र तिला कोणत्या क्षेत्रात जम बसवायचा आहे याचा मार्ग अजून सापडलेला नाही. दरम्यान टिया खूप कमी वयातच त्यांचा बिजनेस देखील हाताळतेय हे विशेष म्हणावं लागेल.
अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनीही मराठी सृष्टीचा एक काळ गाजवलेला आहे. व्योमकेश बक्षी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत त्यांनी चित्रपट मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. विशाल शेट्टी सोबत त्या विवाहबद्ध झाल्या असून विवान आणि शैवा अशी दोन अपत्ये त्यांना आहेत. शैवा ही त्यांची मुलगी दिसायला अतिशय सुंदर असून अभिनय क्षेत्रापासून मात्र ती खूप दूर आहे. सध्या शैवा तिचं शिक्षण पूर्ण करत आहे.
अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी मराठी हिंदी सृष्टीत स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. मुख्य भूमिका ते आता हिंदी मालिकेत सहाय्यक भूमिकांच्या माध्यमातून त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. अभिनेते दीपक देउळकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या असून ईश्वरी ही त्यांना एकुलती एक मुलगी आहे. निशिगंधा वाड यांची मुलगी ईश्वरी ही दिसायला अतिशय सुंदर आहे. मध्यंतरी ईश्वरी दीपक देऊळकर यांच्यासोबत मालिकेच्या सेटवर यायची तेव्हा ती त्यांची निर्मिती संस्था सांभाळेल असे प्रेक्षकांना वाटले होते.
अभिनेत्री किशोरी गोडबोले यांनीही मराठी हिंदी मालिका, चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. किशोरी गोडबोले या पूर्वाश्रमीच्या किशोरी कुलकर्णी . गायक जयवंत कुलकर्णी यांच्या त्या धाकट्या कन्या होत. दिवाळीचा फराळ परदेशात पोहोचवणारे प्रसिद्ध उद्योजक सचिन गोडबोले यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. सई गोडबोले ही त्यांची एकुलती एक मुलगी मल्टी टॅलेंटेड आहे. गायन, अभिनय, परदेशी भाषा तिला अवगत आहेत. याच कारणासाठी सई सोशल मिडियावरही लोकप्रिय ठरली आहे. मध्यंतरी सईने जाहिरात क्षेत्रातही काम केलेले पाहायला मिळाले होते.
अभिनेत्री निशा परुळेकर यांनी हरिओम विठ्ठला, रमाबाई भीमराव आंबेडकर, तीन बायका फजिती ऐका, आम्ही चमकते तारे, काळूबाई पावली नवसाला, गोंदया मारतय तंगडं, पोलिसलाईन, श्यामची शाळा अशा चित्रपटात कधी नायिका तर कधी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. पण गेली अनेक वर्ष त्या अभिनय क्षेत्रातून बाजूला जाऊन राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. ठाण्यातील भाजपाच्या सांस्कृतिक विभागात त्या सहसंयोजक पदी काम करत आहेत. सुरेश बंगेरा यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या असून मयुरी ही त्यांची एकुलती एक मुलगी सोशल मीडिया स्टार आहे. इन्स्पिरेशनल स्पीचसाठी मयुरी सोशल मीडियावर ओळखली जाते.