news

४ वर्षाने भारतात परतलेल्या मराठी अभिनेत्रीचा नवीन स्टार्टअप…परदेशातली नोकरी सोडून सुरू करणार बिजनेस

मालिका क्षेत्रात करिअर केल्यानंतर अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने काही वर्षांपूर्वी परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मृणाल दुसनिस हिने नीरज मोरे सोबत लग्न केले. पण स्वतःच्या करिअरसाठी ती भारतातच राहिली. हे मन बावरे या मालिकेनंतर तीने परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. २०२२ मध्ये मृणालला कन्यारत्न प्राप्ती झाली. पण आता ४ वर्षानंतर निरजसोबत ती मायदेशी परतली आहे. त्यामुळे मृणालने पुन्हा अभिनय क्षेत्रात दाखल होण्याची ईच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे मृणाल लवकरच स्टार प्रवाहच्या आगामी मालिकेत झळकताना दिसणार आहे.

दरम्यान नीरज मोरे सोबत आता तिने भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशातली नोकरी सोडून भारतात परतलेल्या नीरजने आता व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचे ठरवले आहे. नुकतेच नीरज आणि मृणालने त्यांच्या या नवीन प्रोजेक्टबद्दल एक हिंट दिली आहे. या व्यवसायानिमित्त जोरदार तयारी सुरू असल्याचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. काहीतरी नवीन घेऊन येतोय…म्हणत मृणालने तिच्या या व्यवसायबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे ती कोणता बिजनेस सुरू करते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. या प्रोजेक्टमध्ये नीरजचाही हातभार असल्याने हा बहुतेक हॉटेलचा व्यवसाय असावा किंवा कपड्यांचा ब्रँड असावा असे तर्क लावले जात आहेत.

mrunal dusanis with husband
mrunal dusanis with husband

मात्र या व्यवसायाबद्दल ती लवकरच खुलासा करेन असेही तिने म्हटले आहे. आता परदेशातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडलेल्या नीरजला भारतात येऊन कोणता व्यवसाय करण्याची इच्छा आहे हे जाणून घेण्यासाठी मृणालचे चाहते उत्सुक आहेत. त्यासाठी दोघांनाही शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button