news

तो त्यांचा पणतू होता…निवेदिता सराफ झाल्या भावुक

सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी अतुल परचुरे यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. अतुल परचुरे यांच्यासोबत काम न करणारा क्वचितच कोणी कलाकार असेल. त्यामुळे त्यांच्या आठवणींचा खजिना पाहून सगळेचजण हळहळ व्यक्त करताना दिसले. आज अतुल परचुरे यांच्या दादर येथील निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कलाकारांची गर्दी जमली होती. यावेळी मराठी सृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. चिन्मयी सुमित, श्रेयस तळपदे, संजय मोने, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, सुप्रिया पाठारे, सीमा देशमुख, मुग्धा गोडबोले, सुबोध भावे, महेश मांजरेकर, सुकन्या कुलकर्णी, उमेश कामत, मधुरा वेलणकर, प्रदीप वेलणकर, चंद्रकांत कुलकर्णी, अरुण कदम, सुमित राघवन असे असंख्य कलाकार अतुल परचुरे यांना अखेरचा निरोप देताना दिसले. यावेळी निवेदिता सराफ यांना त्यांच्या आठवणीने खूप भावूक केले.

ganpatrao bodas photos
ganpatrao bodas photos

“आमच्या करिअरची सुरुवात टिळक आणि आगरकर या नाटकातून एकाचवेळी झाली होती. माझा खूप चांगला मित्र गेला” अशी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पण अंत्यदर्शनानंतर निवेदिता सराफ मीडियाशी बोलताना खूपच भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. “आम्हाला माहिती आहे की तो गणपतराव बोडस यांचा नातू . गेली २० ते २५ दिवसांपासून अतुलची तब्येत खूपच ढासळली होती. पण तो यातून सुखरूप बाहेर पडेल असे आम्हाला वाटले होते”. असे निवेदिता सराफ यावेळी म्हणाल्या. अतुल परचुरे हे शाळेत असल्यापासूनच रंगभूमीवर काम करू लागले होते. पुढे अनेक चित्रपट मालिकांमध्ये ते दमदार भूमिकेत पाहायला मिळाले. खरं तर अभिनयाचा वारसा त्यांना पणजोबा गणपतराव बोडस यांच्याकडूनच मिळाला होता असे म्हणायला हरकत नाही. गणपतराव बोडस हे संगीत नाट्य अभिनेते तसेच गायक म्हणून परिचयाचे होते. बालगंधर्व यांच्या काळात अनेक संगीत नाटकातून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांची नात म्हणजेच अतुल परचुरे यांच्या आई होत. पणजोबांच्या अंगी असलेले कलेचे गुण अतुल परचुरे यांच्यात आपसूकच आले आणि अभिनय क्षेत्रात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button