प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अतुल परचुरे यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आले नाही पण दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. या आजारामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. मध्यंतरी त्यांनी या आजारपणाची माहिती मीडियाला दिली होती. त्यानंतर अतुल परचुरे यांना पुन्हा अभिनय क्षेत्रात काम मिळावे यासाठी प्रयत्न झाले. दरम्यान आज त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांना असा निरोप देणे प्रेक्षकांना खूप कठीण झाले आहे.
पण त्यावेळी एका मुलाखतीत अतुल परचुरे ह्यांनी एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला होता. त्या मुलाखतीत त्यांनी डॉक्टरांनी त्यांच्यावर चुकीचे उपचार केलं असल्याची सांगितलं होत. त्यावेळी परचुरे म्हणतात ” माझ्या लग्नाच्या २५ व्य वाढदिवसानिमित्त सहकुटुंब मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. तेथून आल्यावर काही दिवसानी मला अचानक त्रास होऊ लागला. थोडंफार खाल्लं तरी पोटात मळमळ व्हायची. काही दिवस असच चाललं मग डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी मला अल्ट्रासोनोग्राफी काढायला लावली. मी ती काढली देखील त्यात असे निदान झाले कि माझ्या यकृतामध्ये गाठ आहे. माझ्यावर उपचार देखील सुरु झाले.
पण ते उपचार करताना काहीतरी चुकीचं जाणवत होत. त्याचा माझ्या शरीरावर उलट परिणाम होऊ लागला. माझी शरीरयष्टी हळूहळू ढासळू लागली. मला चालताना देखील त्रास व्हायचा. स्वादुपिंडावर त्याचा विपरीत परिणाम झाला. त्यानंतर डॉक्टरांनी काही दिवस वाट पाहण्यास सांगितले. शस्त्रक्रियेमुळे कावीळ तसेच यकृतात पाणी भरण्याची भीती त्यांना वाटत होती. हे सर्व पाहून मी डॉक्टर बदलले आणि मग पुढे योग्य उपचार सुरु झाले. हळूहळू प्रकृतीत सुधारणा देखील झाली. माझ्या ह्या वाईट काळात अनेक कलाकारांनी मदत करण्याचा प्रयत्न देखील केला तेही मी कधी विसरणार नाही ” अशी वस्तुस्थिती अभिनेते अतुल परचुरे यांनी त्या मुलाखतीत मांडली होती.