अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या भाचीचे खास फोटो …लॉस एंजेलीस मधील या ठिकाणी नुकताच पार पडला लग्न सोहळा
अभिनेत्री माधुरी दीक्षित भूलभुलैय्या ३ चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली नसली तरी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगण्यात येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून माधुरी दीक्षित या चित्रपटात मंजुलिकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी माधुरी आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम एन्जॉय करताना दिसत आहे. काल रविवारी १३ ऑक्टोबर रोजी माधुरी दीक्षितच्या भाचीचं लग्न पार पडलं. माधुरी दीक्षित यांचा भाऊ अजित दीक्षित यांची मुलगी अंजली आणि डॉ ओजस देशपांडे यांचा काल यूएसए मधील लॉस एंजेलीस येथील स्वामी नारायण मंदिराजवळ हा लग्न सोहळा पार पडला.
दोन दिवसांपासून या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. संगीत सोहळा, हळद, मेंदी सोहळा पार पडल्यानंतर पारंपरिक पद्धतीने अंजली आणि ओजसचे लग्न थाटात पार पडले. अंजली ही पीएचडी धारक असून ओजस हा डॉक्टर आहे. सध्या ते दोघेही परदेशातच स्थायिक आहेत. दरम्यान लाडक्या भाचीचं लग्न अटेंड करण्यासाठी नेने कुटुंबीय दोन दिवस अगोदरच यूएसएला रवाना झाले होते. यावेळी डॉ श्रीराम नेने, अरीन आणि रियान दोघेही उपस्थित होते.
भाचीच्या लग्नात माधुरी दीक्षितने गोल्डन रंगाची डिझायनर साडी नेसली होती. तेव्हा या लग्नात आत्याचाच कौतुक सोहळा रंगलेला पाहायला मिळाला. माधुरी दिक्षितला अजित, रुपा, भारती अशी बहीण भावंड आहेत. अजित दीक्षित हे बिजनेसमन आहेत. तर त्यांची मुलगी अंजली हिने Uci स्कुल ऑफ फार्मसी अँड फार्मसिटीकल सायन्स मधून पिचडी प्राप्त केली आहे.