प्राजक्ता माळीच्या फुलवंती चित्रपटाला मोठा प्रतिसाद?….3 दिवसांत जमवला एवढया कोटींचा गल्ला
‘जुळुन येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली प्राजक्ता माळी आता चित्रपट निर्माती म्हणून आपला वेगळा ठसा उमटवत आहे. प्राजक्ता माळीने आजवर अभिनेत्री, नृत्यांगना, उद्योजिका म्हणून नाव कमावले आहे. पण आता ‘फुलवंती’ हा तिची निर्मिती असलेला पहिला वहिला चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून प्राजक्ता माळीच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. प्रेक्षकांचा मिळत असलेला हा प्रतिसाद पाहून प्राजक्ताने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या चित्रपटात प्राजक्ता माळीसोबत अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत दिसत आहे. फुलवंती चित्रपटाचे कथानक हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित आहे.
महत्वाचं म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल तरडे हिने केलं आहे. त्यामुळे प्राजक्तासह स्नेहललादेखील चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा आहेत. दरम्यान प्राजक्ता माळीने कोट्यवधींच फार्म हाऊस खरेदी केल्यानंतर चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरण्याचं मोठं धाडस दाखवलं आहे. पण प्रेक्षक आपल्याला नक्कीच साथ देतील असा तिला विश्वास आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी याला संमिश्र प्रतिसाद दिला आहे. काही ठिकाणी प्रिबुकिंग होत असल्याने जवळपास हाऊसफुल्ल शो चालत आहेत.
तर बऱ्याच ठिकाणी खुर्च्या रिकाम्या असलेल्या पाहायला मिळाल्या. ११ ऑक्टोबर रोजी पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ४४ लाखांचा गल्ला जमवला. काल १२ ऑक्टोबर रोजी दसरा असूनही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद देत ३६ लाखांची कमाई करून दिली. तर आज देशभरातून सकाळच्या शोला ८ लाख इतकी कमाई झाली. आज रात्रीपर्यंत हा कमाईचा आकडा वाढलेला पाहायला मिळेल. दरम्यान दोन दिवसात चित्रपटाने ८० लाखांची कमाई केली आहे. तर आजची आकडेवारी लक्षात घेऊन चित्रपट १ कोटीचा टप्पा यशस्वीपणे गाठेल असा प्राजक्ताला विश्वास आहे.