news

अंबाबाईला आळवणी घालणारी ही आज्जी आहे दिग्गज मराठी अभिनेत्याची पत्नी.

नवरात्रीच्या दिवसांत अंबाबाईच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागते. अशातच अंबाबईला आळवणी घालणाऱ्या एका आजीचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या आज्जी आहेत मराठी सृष्टीचा एक काळ गाजवलेले दिवंगत अभिनेते राजशेखर यांच्या पत्नी. जनार्दन भूतकर असे त्यांचे खरे नाव पण अभिनय क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी हेच नाव पुढे आत्मसात केले. राजशेखर हे मूळचे कोल्हापूरचे त्यांच्या पहिल्या पत्नी माधवी राजशेखर आता वृद्धापकाळाने थकल्या आहेत. पण वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांचा देवी आईला भेटण्यासाठीचा उत्साह दांडगा आहे. नितीन राजशेखर हे त्यांच्या मुलाचे नाव. तर त्यांचा नातू राज राजशेखर हाही मराठी मालिका चित्रपट सृष्टीशी जोडला गेलेला आहे.

rajshekhar wife madhavi rajshekhar
rajshekhar wife madhavi rajshekhar

स्क्रीनप्ले रायटर म्हणून अनेक मालिकांसाठी त्यांनी काम केलं आहे. राज राजशेखर या नातवानेच माधवी राजशेखर यांचा देवी आईला आळवणी घालण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबद्दल राज राजशेखर म्हणतात की,” तर… या व्हिडियो मध्ये जी देवीची आळवणी करणारी स्त्री दिसते. ती आहे ‘माधवी राजशेखर’… मराठी सिनेमासृष्टी गाजवणार्या ‘सिनेस्टार राजशेखर’ यांची ‘पत्नी’. पण या माझ्या आज्जीची हीच फक्त ओळख नाही बरं. माझी आज्जी म्हणजे राजशेखरांच्या घरातील देवा पुढचा ‘दिवा’, जो त्या देवाच्या मंदिरात उजेड पडतोचं पण ज्याचा प्रकाश डोळ्यांना बोचत नाही तर, मनाला शांती प्रदान करतो. खरतर मला लहानाचं मोठ्ठ करण्यात माझ्या आज्जीचा खूप मोठा वाटा आहे. आज्जी असूनही आईची माया हिनेच केली माझ्यावर. माझ्या पोटात दोन घास जावेत (ते हि घरी केलेल्या स्वयंपाकाचे) म्हणून माझी विनवणी करण्यापासून, ते मायेनं मला जेवण वाढण्या पर्यंत सगळं काही हिने केलं. कधी डबा घरीच विसरलो तर वेळ प्रसंगी बाबा आणि चाचू प्रमाणे हि देखील माझ्या शाळेत येऊन मला डबा द्यायची.

rajshekhar grandson raaj rajshekhar
rajshekhar grandson raaj rajshekhar

असं म्हणतात कि या जगात निस्वार्थी प्रेम कोणीच करत नाही, प्रत्येकाला प्रेमाच्या बदल्यात काही न काही हवं असतं! मग ते कधी पैशांच्या स्वरूपात, शरीराच्या स्वरुपात, मानसिक आधाराच्या स्वरुपात किंव्हा प्रेमाच्या बदल्यात निस्सीम प्रेमाच्या स्वरुपात… पण काही नं काही हवं तर असतंच! परंतु या सर्वाला माझी आज्जी मात्र अपवाद आहे. हिने हिच्या नवर्यावर, हिच्या मुलांवर, हिच्या नातवांवर, हिच्या सोबत जोडल्या गेलेल्या किंबहुना हिने स्वतःसोबत जोडून घेतलेल्या प्रत्येक नात्यावर निस्सीम प्रेम केलं. तेही कोणतीही अपेक्षा नं ठेवता…! कधी कधी मला वाटतं, कस जमलं असेल आज्जीला हे? कोणत्या साच्यात घडली आहे हि ? खरतर आज राजशेखर घराणं जे काही आहे त्यात हिच्या पुण्यायीचा वाटा हा खूपचं मोठ्ठा आहे. आमच्या घरी दोन अंबाबाई आहेत. एक जी सोन्याचा मुखुट घालून मंदिरात विराजमान आहे ती, आणि दुसरी जी केसांना चांदी माळून घरी वास करून आहे ती. आज बाबांनी आज्जीचा हा व्हिडियो पाठवला. साधारण 80 वर्षाच्या आसपास असणारी हि माझी आज्जी, आजही अंबाबाईची निस्सीम भक्ती करते. न चुकता दर्शनाला जाते. कधी कधी वाटतं मंदिराच्या गाभार्यात दोन जगदंबाचं एका मेकला पाहत असाव्यात. बाकी हिची हि खणखणीत आवाजातील देवीची स्तुती ऐकून ती जगदंबा देखील आनंदली असेल. आज्जी आय लव यु” म्हणत राज राजशेखर यांनी आपल्या आज्जीची नव्याने ओळख करून दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button