७० दिवस बिग बॉसच्या घरात राहून आलेल्या सुरजला होऊ लागला त्रास….अंकिता म्हणते त्याला आता सांभाळण्याची
मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन संपला आणि विजेत्या सुरजचे गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. गेले दोन तीन दिवस मीडिया, धावपळ आणि देवदर्शन अशा वातावरणाला सूरज सामोरा जात आहे. त्यामुळे गावात पार पडलेल्या मिरवणूक सोहळ्यात सुरजला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. ढोल ताशे, डीजे अशा आवाजामुळे सूरजला डोकेदुखी झाली, त्यामुळे दोघा मित्रांनी त्याला सावरत घरापर्यंत नेऊन सोडले. हे सर्व पाहून अंकिता वालावलकर हिने सुरजच्या या मनस्थितीबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. खरं तर बाहेरच्या जगाशी संपर्क नसलेले हे सगळेच सदस्य इंटरव्ह्यू, मीडिया, फॅन्सच्या गरड्यामुळे हैराण झाले आहेत. प्रेक्षकांचं मिळत असलेल्या या प्रेमामुळे त्यांना गहिवरून येत आहे.
पण ७० दिवसानंतर बाहेरच्या वातावरणात आल्यानंतर त्याला एका विश्रांतीची आवश्यकता असते. गेले दोन तीन दिवस सुरजला विश्रांती मिळत नाहीये त्याचाच परिणाम म्हणून डोकेदुखीचा त्रास त्याला जाणवू लागला आहे. सुरजचा हा व्हिडीओ पाहून अंकिता म्हणते की, “आम्ही अशा वातावरणातून आलोय की मला स्वतःला त्रास होतोय नॉर्मल सिटी लाईफचा.त्याला खरंच सांभाळायची गरज आहे, आम्ही helpless आहोत…पण बिग बॉस हाऊस मधून बाहेर डील करताना थोडे दिवस आराम लागतो…देवाक काळजी!”…म्हणत अंकिताने सूरजबद्दल एक काळजी व्यक्त केली आहे. सध्या हे सगळे सदस्य सुरजला भेटण्यासाठी उत्सुक आहेत.
पण त्याला थोडी विश्रांतीची गरज आहे त्यालाच नाही तर या सगळयांनाच स्वतःसाठी थोडा वेळ हवा आहे. त्यानंतर हे सगळे सुरजची भेट घेतीलच आणि म्हटल्याप्रमाणे सुरजला मदतही करतील. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला सूरज जेव्हा सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जात होता तेव्हा त्याचा एक चाहता गाडीने त्याचा पाठलाग करत होता. गाडीचा वेग इतका होता की काही अनर्थ घडला असता ते पाहून सुरजने ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावली आणि चाहत्याची भेट घेऊन त्याला सेल्फी काढू दिला.