मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन सूरज चव्हाणने गाजवला. तो या शोचा विजेता व्हावा अशी सर्वांचीच इच्छा होती. शेवटी प्रेक्षकांच्या मनाचा आदर राखून यावेळी बिग बॉसने योग्य निर्णय घेत सुरजला विजयी घोषित केले. नुकताच सूरज आणि अभिजित सावंत दोघेही ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाले. या शोमध्ये सूरज त्याच्या डायलॉगसाठीही तेवढाच प्रसिद्ध झाला. अगदी रितेश सह त्याने अक्षय कुमारलाही या डायलॉगवर थिरकायला लावले. झापुक झुपुक, बुक्कीत टेंगुळ, गुलीगत धोका आणि sq yq zq अशा डायलॉगसाठी तो प्रसिद्ध झाला. पण त्याचे हे सगळे डायलॉग त्याच्याच चित्रपटातले आहेत असा दावा दीग्दर्शकाने केला आहे. सुरज चव्हाण हा बारामतीचा. बहिणींची लग्न झाल्याने तो एकटाच राहू लागला. कधी आत्याकडे तर कधी बहिणीकडे तो जेवायचा. पण बऱ्याचदा गावच्या मरिमाता मंदिरातला प्रसाद खाऊनच त्याने दिवस काढले होते.
अशातच त्याच्या भाच्याने टिकटॉकवर व्हिडीओ कसे बनवायचे ते त्याला शिकवले आणि वेडेवाकडे चाळे करून तो लोकांचे मनोरंजन करू लागला. सोशल मीडियावर त्याची वाढलेली प्रसिद्धी पाहून काही दिग्दर्शकांनी सुरजला चित्रपटात झळकण्याची संधी देऊ केली. शिवाजी दोलताडे हे त्या दिग्दर्शकाचे नाव. लॉकडाऊनच्या काळात सुरजला घेऊन त्यांनी मुसंडी हा चित्रपट बनवला. सुरजचे सगळे डायलॉग हे त्याच चित्रपटातले आहेत असा त्यांनी दावा केला आहे. शिवाजी दोलताडे यांचा आणखी एक ‘राजा राणी’ हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. याही चित्रपटात सुरजला एक महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने त्यानी सुरजच्या डायलॉगची पुन्हा एकदा आठवण करून दिली. राजा राणी या चित्रपटात वैष्णवी शिंदे, रोहन पाटील, भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, तानाजी गळगुंडे, सूरज चव्हाण अशी बरीचशी कलाकार मंडळी झळकली आहेत. शिवाजी दोलताडे यांनी सुरजला या चित्रपटासाठी टक्कल करायला लावले होते.
दिग्दर्शकार विश्वास असल्याने सूरज त्यांच्यासोबतच केस कापायला जात असे. लॉक डाउनच्या काळात तर सूरज काही महिने आमच्याच जवळ राहिला होता. तो खूप गरीब घरातला मुलगा आहे आणि माणुसकी जपलेला मुलगा आहे त्यामुळे बरेचदिवस तो अमच्याचकडे राहायचा, झोपायचा असे ते म्हणतात. चित्रपटात एक सीन होता त्यावेळी चार मुलं एका तलावात पोहतात असा सीन होता. आम्ही त्यांना पोहता येतं म्हणूनच अगोदर तसं विचारलं होतं पण त्यातली तीन मुलं दिसली आणि एक दिसेनासा झाला. ही गोष्ट सुरजच्या लक्षात आली आणि त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली आणि त्या मुलाचा जीव त्याने वाचवला. म्हणजे सूरज स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा अगोदर विचार करतो हाच त्याचा गुण सगळ्यांना खूप आवडला.