news

तुझं कोण नाही तर मी आहे ना? पण एकटं आलोय एकटं जाणार… निक्कीला समजवताना सूरज चव्हाणने

मराठी बिग बॉसच्या ५ व्या सिजनमध्ये आता ८ सदस्य राहिले आहेत. १०० दिवसांचा हा गेम आता ७० दिवसांतच आटोपता घेणार असल्याने आठवड्यातून दोन सदस्यांना एक्झिट घ्यावी लागत आहे. या आठवड्यातही संग्राम नंतर अरबाजला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. पण अरबाजच्या एक्झिटमुळे त्याची घरातली खास मैत्रीण निक्की मात्र पुरती कोसळली आहे. “आता मी या घरात कशी राहू?, कोणाशी बोलू?” असे म्हणत तिने टाहो फोडलेला पाहायला मिळाला. अरबाजगेल्याने मनातून खचलेली निक्की एकटी बसली असताना सूरज मात्र तिला प्रोत्साहन द्यायला पुढे आला.

suraj chavan and nikki tamboli in bigboss marathi
suraj chavan and nikki tamboli in bigboss marathi

निक्की रडत बसलेली पाहून सुरजला वाईट वाटलं तो तिला समजावताना म्हणतो की, “तुला कोणी नाही ना, मी आहे ना!…आपली फॅमिली आहे हे घर आपलं आहे. आता रडायचं नाही, स्ट्रॉंग व्हायचं आपल्याला.. आपल्या ज्या भावना असतात त्या डोळ्यातून बाहेर पडतात…आपला जवळचा माणूस आपल्याला सोडून गेल्यावर. आपण एकटं आलोय एकटं एकटं जाणार, फोकस गेमवर करायचा. मी रडणार, मला इमोशन्स आहेत पण कसंए इथं एकट्यानेच खेळायचंय. मग स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही.”

सुरजच्या या वागण्यामुळे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. आपण एकटं आलोय एकटं जाणार त्यामुळे घरातल्या सदस्यांसोबत जे नातं तयार झालंय ते इथपर्यंतच मर्यादित असणार आहे याची त्याला जाणीव झाली आहे. ही मंडळी बाहेर पडल्यानंतर आपापल्या कामात व्यस्त होणार आहेत. आपल्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळेल की नाही, भेट घडून येईल की नाही याची शाश्वती देता येणार नाही. सुरजने त्याच्या मनात ही गोष्ट अगदी फिट केली आहे. तो हे निक्कीला समजावून सांगतोय यातच त्याला आयुष्याचं गणित कळलं अशी प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांकडून देण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button