पहिल्याच दिवशी नवरा माझा नवसाचा २ चित्रपटाची छप्परफ़ाड कमाई… रात्रीच्या शोला ९२ टक्के प्रतिसाद मिळत कमावला इतका गल्ला
शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी बहुचर्चित “नवरा माझा नवसाचा २” हा चित्रपट प्रदर्शित झाला. नवरा माझा नवसाचा या चित्रपटात वॅकी आणि भक्तीच्या नवसाची कथा पाहायला मिळाली होती. दरम्यान या सिकवलमध्ये प्रेक्षकांना दुसऱ्या नवसाची कहाणी पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी पहिला चित्रपट पाहायलाच पाहिजे अशी अट नाही कारण या चित्रपटाचे कथानक संपूर्णपणे वेगळे असलेले पाहायला मिळत आहे. अशोक सराफ, जॉनी लिव्हर, वैभव मांगले यांच्यासह बरेचसे चेहरे याही चित्रपटाचा भाग बनले आहेत. फक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट निवडताना यावेळी ट्रेनचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच अशोक सराफ यांना कंडक्टर ऐवजी टीसीच्या भूमिकेत धमाल उडवताना पाहायला मिळत आहे.
नवरा माझा नवसाचा हा संपूर्ण चित्रपट सचिन पिळगावकर यांनीच बनवला आहे. कुठल्याही मदतीशिवाय त्यांनी हा चित्रपट स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रमोशनसाठी सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त फायदा करून घेतला. आपला चित्रपट लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा हे तर इन्फ्लुइंझरकडून पटवून देऊ शकले. याचाच फायदा असा झाला की तब्बल १००० हून अधिक स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातील ६०० हून अधिक स्क्रीनसना प्रेक्षकांनी हाऊसफुल्लचे बोर्ड लावण्यात यश मिळवले. मराठी चित्रपटाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडल्याने नवरा माझा नवसाचा २ चित्रपटाने एक इतिहासच रचला आहे.
काल प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नवरा माझा नवसाचा चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सकाळच्या शोला थिएटरमध्ये ४७ टक्के प्रेक्षकांनी गर्दी केली. तर दुपारी उत्तम प्रतिसाद मिळाला असून रात्रीच्या शोला ९२ टक्के प्रतिसाद मिळाला. यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तब्बल २ कोटींची कमाई करत यशाचा पहिला टप्पा सर केला आहे. काल दुपारपर्यंत या चित्रपटाची कमाई १.२३ कोटी इतकी झाली होती. रात्रीच्या हाऊसफुल्ल शोमुळे हा आकडा वाढलेला पाहायला मिळाला. दरम्यान आज शनिवारी आणि रविवारी विकेंडमुळे चित्रपट पाहायला प्रेक्षक गर्दी करत असतात. त्यामुळे या दोन दिवसात हा आकडा ९ कोटींपेक्षा अधिक कमाई करू शकेल असा विश्वास दिला जात आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रिबुकिंग केलेलं आहे त्यामुळे हा संपूर्ण आठवडा चित्रपट गृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड नक्की लावले जातील.