news

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्री सोबत गैरवर्तणूक… व्हिडिओ होतोय व्हायरल

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रोज हजारोंच्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात. अशातच मराठीसह बॉलिवूड, हिंदी मालिका सृष्टीतील कलाकारही तिथे बाप्पाचे दर्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. लालबागचा राजा काही गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत राहतो तो तिथल्या गर्दीसाठी. या गर्दीला आवर घालण्यासाठी गार्डसना तारेवरची कसरत करावी लागते, वेळप्रसंगी कधी झटापटही होते. असाच काहीसा प्रकार कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री सिमरन बुधरूप हिच्यासोबत घडला आहे. नुकतीच सिमरन तिच्या आईसोबत लालबागच्या दर्शनाला गेली होती. लाल बागच्या राजाला आपल्या मोबाईलमध्ये कैद करता यावे म्हणून तिने व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली.

पण यामुळे महिला सुरक्षा रक्षकांनी या दोघीना व्हिडीओ काढण्यापासून थांबवले त्यादरम्यान सुरक्षा रक्षकसोबत थोडीशी झटापट झाली. हा व्हिडीओ सिमरनने सोशल मीडियावर शेअर केलेला पाहायला मिळतो आहे. या व्हिडिओवर तिने तिची बाजू मांडताना म्हटले आहे की, “या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आशा करतो की हे कार्यक्रम आयोजक आणि कर्मचाऱ्यांना यातून काही चांगले काम करण्याची इच्छा होईल. म्हणून काम करेल. जेणेकरून अशावेळी काहीतरी सकारात्मक वातावरण निर्माण करता येईल.” सिमरनच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अनेक सेलिब्रिटी, चाहते आणि तिच्या मित्रांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. सिमरनचा हा व्हिडीओ याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

actress Simran Budharup
actress Simran Budharup

सिमरन बुधरूप ही हिंदी मालिका अभिनेत्री आहे. कुमकूम भाग्य, नजर, दुर्गा अशा मालिकेतून तिने काही महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सिमरन काल तिच्या आईसोबत लालबागच्या दर्शनासाठी गेली होती. तिथे ती व्हिडीओ शूट करत असताना सुरक्षा रक्षक महिलांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि व्हिडीओ काढण्यास मनाई केली. या व्हिडिओत सिमरनला धक्काबुक्की करण्यात आली असल्याचे तिने म्हटले आहे. अशा सोहळ्याना गालबोट लागता कामा नये असे म्हणत तिने लालबागच्या आयोजकांचे लक्ष वेधून घेतले आहे. धक्काबुक्की करण्या पेक्षा त्यात थोडी शिस्तता बाळगली गेली तर अधिक योग्य होईल असे तिने या प्रसंगाबद्दल मत व्यक्त केलं आहे. पण जिथे सेलिब्रिटींना अशा घटनेला सामोरे जावे लागत असेल तिथे सामान्यांची काय अवस्था होत असेल याबद्दल न बोललेलंच बरं अशाही प्रतिक्रिया तिला मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button