नुकताच मराठी मालिका अभिनेता प्रतीक पाटील याचा थाटात साखरपुडा पार पडला आहे. निकिता पाटील हिच्याशी प्रतीक लवकरच विवाहबद्ध होत आहे. या साखरपुड्यानिमित्त हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी त्यांचे खास अभिनंदन केलेले पाहायला मिळत आहे. प्रतिकने झी मराठीच्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून सुहासची भूमिका साकारली होती. हार्दिक जोशी सोबत काम करताना त्यांची खूप छान मैत्री जुळून आली होती. हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नात प्रतीक आवर्जून उपस्थित राहिला होता.
मालिकेनंतरही त्यांनी त्यांचं भावासारखं नातं जपून ठेवलं आहे. प्रतीक पाटील याला अभिनयाची आवड आहे. मालिका, चित्रपटातून काम करता यावे यासाठी तो मोठी मेहनत घेताना दिसतो. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत तो सकारात्मक भूमिका साकारताना दिसला होता. प्रतीक पाटील आणि निकिता पाटील यांचे नुकत्याच पार पडलेल्या साखरपुड्यानिमित्त अभिनंदन!.