आज बिग बॉसच्या घरातून ३ रा सदस्य बाहेर पडला. गेली २७ दिवस १४ सदस्य बिग बॉसच्या घरात राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. या १४ मधील चार सदस्य या आठवड्यात एलिमीनेट झाले. वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, आर्या जाधव आणि अभिजित सावंत हे ४ जण या आठवड्यात एलिमीनेशनच्या प्रक्रियेला सामोरे जाताना दिसले. अर्थात या आठवड्यात एक ट्विस्ट देखील पाहायला मिळाला. भाऊच्या धक्क्यावर जान्हवी किल्लेकर हिची खरडपट्टी काढण्यात आली. एका प्रोमोमध्ये रितेश देशमुख जान्हवीला घराबाहेर काढताना दिसला. यामुळे प्रेक्षक खुश झालेले दिसले, पण प्रत्यक्षात मात्र जान्हवीला जेलमध्ये टाकण्यात आले. तिला दिलेली ही शिक्षा पाहून प्रेक्षकांना काहीसा दिलासा मिळाला.
पण जान्हवीने बिग बॉसच्या घराबाहेर जावं अशी तमाम प्रेक्षकांची इच्छा होती. पण तसे घडणे अशक्य होते कारण जान्हवीमुळे बिग बॉसला चांगला टीआरपी मिळाला होता. दरम्यान आज रविवारी भाऊच्या धक्क्यावर ‘इमर्जन्सी’ या आगामी चित्रपटाचे कलाकार हजेरी लावताना दिसले. श्रेयस तळपदे, कंगना राणावत यांनी घरातील सदस्यांना बोलतं केलेलं पाहायला मिळालं. आतापर्यंत पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले आणि योगिता चव्हाण हे तीन सदस्य एलिमीनेट झाले. या आठवड्यात चौथा सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर जाताना दिसला.
सरते शेवटी रितेशने सेफ सदस्य म्हणून आर्या जाधव नंतर अभिजित सावंत यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे वैभव आणि इरिना दोघांमधून एक जण बाहेर जाणार हे निश्चित झाले. इतके दिवस इरिना आणि वैभवचे या घरात छान बॉंडिंग जुळून आले होते. पण त्यांची आज बिग बॉसच्या घरात ताटातूट झालेली पाहायला मिळाली. आज बिग बॉसच्या घरातून इरिनाला बाहेर पडावे लागले.