हिंदी चित्रपट, मालिका अभिनेत्री आशा शर्मा यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले आहे. आशा शर्मा यांच्या निधनाच्या बातमीने हिंदी सृष्टीत शोककळा पसरली आहे. नायक नायिकेची आई, सहाय्यक भूमिका, ते अगदी आजीच्या भूमिकेने आशा शर्मा यांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने वठवल्या होत्या. या इंडस्ट्रीत एक उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांनी वेगळी ओळख मिळवली होती. ४० वर्ष रंगभूमीवर अविस्मरणीय काम केलं. नुक्कड, कुम कुम भाग्य, शु कोई है, झी हॉरर, माटी के रंग , हम लोग, बुनियाद, मर्यादा अशा मालिकेतून त्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकल्या होत्या. अल्लाह मेहरबान गधा पेहलवान, लोहे के हाथ, जीवन दाता, घर आया मेरा परदेसी, हम तुम्हारे है सनम, चांदणी, आदीपुरुष अशा गाजलेल्या चित्रपटात त्या झळकल्या होत्या.
आदीपुरुष या चित्रपटात त्या एका छोट्याशा भूमिकेत दिसल्या होत्या. सलमान खान, आमीर खान, माधुरी दीक्षित, सनी देओल, ऋषी कपूर अशा मोठ्या स्टार्स सोबत त्यांना अभिनयाची संधी मिळत गेली. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील त्यांचा हा प्रदीर्घ प्रवास आज इथे संपलेला पाहायला मिळतो. आशा शर्मा हा हिंदी सृष्टीचा एक प्रसिद्ध चेहरा होता त्यामुळे त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. आशा शर्मा यांना आमच्या समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली!.