news

माझ्या मुलीला शाळेत सगळे विचारू लागले आहेत इतका त्रास …. मृत्यूच्या बातमीवर श्रेयस तळपदे भडकला

सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली ज्यामुळे श्रेयस तळपदेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोणीतरी जाणून बुजून अभिनेता श्रेयस तळपदे याच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. सुरुवातीला ही बातमी वाचल्यावर श्रेयसने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण आता या बातमीने श्रेयसच्या मुलीच्या मानवर वाईट परिणाम होत आहेत. एका व्हायरल बातमीत श्रेयस तळपदेचा मृत्यू झाला अशी बातमी त्याने वाचली होती. पण यामुळे त्याच्या कुटुंबावर परिणाम झाल्याने तो स्वतः याबद्दल खुलासा करताना म्हणतो आहे की, ” मी जिवंत आहे, आनंदी आहे आणि उत्तम आहे…माझ्या मृत्यूच्या बातमीवर मी इथे एक खुलासा करू इच्छितो.

shreyas talpade palying with daughter
shreyas talpade palying with daughter

विनोदबुद्धी चांगली पण त्याचा गौरवापर हा तुम्हाला इजा पोहोचवू शकतो. एक थट्टा म्हणून ही बातमी व्हायरल करण्यात आली, पण ज्यांना माझी काळजी आहे त्यांना हे धक्कादायक देणारं होतं. माझ्या कुटुंबाला या गोष्टींमुळे त्रास होत आहे. मला एक मुलगी आहे तिला या खोटया बातमीमुळे तिच्यावर परिणाम होत आहे. तिचे वर्गमित्र आणि शिक्षक याबद्दल तिला प्रश्न विचारत आहेत. तिला अजूनही अशा गोष्टी समजत नाहीत. मी ही बातमी दुपारी वाचली पण या बातमीकडे मी दुर्लक्ष केलं. पण यानंतर माझ्या काळजीपोटी अनेकांचे फोन कॉल्स आले. मला त्या व्यक्तीचं नाव जाहीर करायचं नाही. त्याला फेमस होण्यासाठी मी तसं करणार नाही. त्यामुळे मला ही जाहीरपणे सांगण्याची वेळ आली आहे की हे सगळं थांबवा, मी जिवंत आहे आणि ठीक आहे” असे म्हणत श्रेयसने त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

shreyas talpade family photo
shreyas talpade family photo

श्रेयस तळपदेची प्रमुख भूमिका असलेला इमर्जन्सी हा बॉलिवूड चित्रपट येत्या ६ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. पाच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या चित्रपटामुळे श्रेयस तळपदेच्या मृत्यूची बातमी पसरवली जाते का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button