news

संदीप खरेची मुलगी झळकणार नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत… तर शिल्पा नवलकर विरोधी भूमिकेत

कलर्स मराठी वाहिनी आता नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. मराठी बिग बॉसनंतर आता या वाहिनीने नव्या मालिकेची घोषणा केली आहे. “दुर्गा” असे या मालिकेचे शीर्षक असणार आहे. कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणारी ही दुर्गा आता सज्ज झालेली आहे. या दुर्गाच्या भूमिकेत अभिनेत्री रुमानी खरे झळकणार आहे. तर लोकमान्य मालिकेत आगरकरांची भूमिका साकारणारा अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रुमानी आणि अंबर यांची ही प्रमुख भूमिका असलेली पहिलीच मालिका असणार आहे. याअगोदर रुमानीने बालकलाकार म्हणून चित्रपटातून काम केले होते. झी मराठीच्या तू तेव्हा तशी या मालिकेत ती नायिकेच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती.

shilpa navalkar in durga serial
shilpa navalkar in durga serial

तर अंबर गणपुळे हा रंग माझा वेगळा मालिकेनंतर लोकमान्य मालिकेत सहाय्यक भूमिकेत दिसला होता. त्यामुळे दोघेही या मालिकेसाठी खुपच उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. या मालिकेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर वृंदा गजेंद्र अहिरे यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री होताना दिसत आहे. नायिकेच्या आईची भूमिका त्या साकारत आहेत. तर शिल्पा नवलकर एका दमदार भूमिकेत पुन्हा एकदा झळकणार आहेत. या मालिकेत त्या विरोधी भूमिका साकारत असल्याने या भूमिकेबद्दल त्या खूप उत्सुक आहेत.

durga serial actress rumani khare
durga serial actress rumani khare

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button