news

जान्हवीनं स्वतःचंच हसू करून घेतलं…सेलिब्रिटींनीही दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

काल मराठी बिग बॉसच्या घरात खेल खेल में या चित्रपटाचे कलाकार पाहुणे म्हणून भाऊच्या धक्क्यावर हजेरी लावताना दिसले. त्यामुळे घरात खेळीमेळीचे वातावरण तयार झाले होते. अक्षय कुमारने वर्षा उसगावकर यांना समोर बघून जुनी आठवण काढली. तू अजूनही तशीच दिसतेस म्हणत अक्षयने त्यांच्या दिसण्याचे कौतुक केले. ही माजमस्ती चालू असतानाच रितेशने जान्हवीची चांगलीच कानउघडणी केली होती. तिने केलेली चुगली सगळ्यांसमोर उघड झालेली पाहून जान्हवी मात्र पुरती गडबडून गेली. अगोदर तिने तसे बोलल्याचा साफ नकार दिला. पण आता निक्की सगळं क्रेडिट घेऊन जातेय हे तिचे शब्द निक्कीच्या मनाला नक्कीच लागले असतील या विचाराने जान्हवी तर चक्क भोवळ येऊन पडली.

janvi in big boss marathi
janvi in big boss marathi

दम्याचा अटॅक आल्याने तिच्यावर तातडीने उपचार केले मात्र पुन्हा भाऊच्या धक्क्यावर परतल्यानंतर जान्हवी अंकितासोबत डान्स करू लागली. तिचे हे कृत्य पाहून मराठी सेलिब्रिटींनी तिची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. जान्हवीने बिग बॉसच्या घरात हे नाटक करून स्वतःचं हसू करून घेतलंय अशीच प्रतिक्रिया मिळू लागली आहे. तर तिकडे जय दुधानेने तिच्या या ओव्हरऍक्टिंगसाठी शासनाकडे कुठला पुरस्कार असला तर द्यावा अशी मजेशीर प्रतिक्रिया दिलेली आहे. हरीश दुधाडे, मुग्धा गोडबोले, वैभव घुगे, तेजश्री जाधव, सुशील इनामदार या सेलिब्रिटींनी जान्हवीच्या कृत्याकडे पाहून विनोदाचे फटकारे मारले आहेत. जान्हवीने भाग्य दिले तू मला या मालिकेत सानियाची विरोधी भूमिका साकारली होती. त्यात अमित रेखी सोबत तिने काम केले होते. या चित्रपटाचा एक सीन अमितने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अशा आशयाचा त्यात डायलॉग आहे जो जान्हवीच्या कृत्याशी मिळताजुळता आहे.

त्यामुळे एकप्रकारे सेलिब्रिटी सुद्धा जान्हवीच्या कृत्याची आता खिल्ली उडवू लागले आहेत. शासनाच्या पुरस्कारावर आक्षेप घेणं, भोवळ येणं, दम्याचा अटॅक येणं आणि त्याच्या दुसऱ्या क्षणाला गाण्यावर थिरकण या गोष्टींमुळे जान्हवी सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे. रितेशने सांगितलेल्या तिच्या चुगलीचा निक्कीवर काही फरक पडतो का हे पाहणे आता रंजक ठरणार आहे. तूर्तास या आठवड्यात नो एलिमीनेशनमुळे कोणीच घराबाहेर गेलं नाही पण पुढच्या काही दिवसात जान्हवी अशीच वागत राहिली तर तिला या घरातून हाकलण्याची नक्कीच मागणी होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button