तुला दर महिन्याला कमीत कमी ५० हजार रुपये कसे मिळवायचे हे … लोकं फसवतात म्हणून डीपीने सांगितला सुरजला मोलाचा सल्ला
मराठी बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण सुरुवातीला थोडासा घाबरलेला पहायला मिळाला. पण बिग बॉसने दिलेल्या सपोर्टनंतर तो स्थिरावलेला दिसला. सूरज चव्हाण हा सोशल मीडिया स्टार आहे. टिकटॉकमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या घरात आल्यानंतर सुरजने रिबीन कापायचे ८० हजार रुपये मिळत असल्याचे सांगितले होते. पण खरं तर सुरजला अनेकांनी फसवलं याचा खुलासा सुरजने आणि त्याच्या बहिणीने देखील सांगितलं. या मिळालेल्या पैशातून त्या लोकांनी सुरजला एक खोली बांधून दिली ज्याला प्लास्टर करून देण्यात आलं. सूरजचं बँकेचं अकाउंट देखील नाहीये बिग बॉसच्या घरात येण्याआधी त्याने बँकेचं अकाउंट उघडलं असे त्याची बहीण सांगते.
त्यामुळे प्रसिद्धी मिळवूनही सुरजला मिळालेला मोबदला दुसऱ्यांनी हडपला हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात त्याला मोलाचा सल्ला देण्यात आला आहे. सूरजचा स्वभाव भोळा आहे मिळालेले पैसे कसे वापरावे याचेही त्याला ज्ञान नाही. एवढंच काय तर लिहिता वाचता येत नसल्याने अनेकांनी त्याच्या अज्ञानाचा गैरफायदा करून घेतला. त्याचमुळे धनंजय पोवार यांनी त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिता वालावलकरच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. अंकिता वालावलकर ही मुलगी खूप चांगली आहे. तिने मलाही योग्य ते मार्गदर्शन दिलेलं आहे. सोशल मीडिया कसा हँडल करायचा इथपासून तिने मला मार्गदर्शन केलं आहे. तू बाहेर गेल्यानंतर अंकिताला भेटत राहा तिला फोन करत राहा. तुझे व्हीडियो कसे बनवायचे पैसे कसे मिळवायचे हे सगळं ती तुला सांगेल. एका पैशाला ती तुला कधी फसवणार नाही.
तुला दर महिन्याला कमीत कमी ५० हजार रुपये कसे मिळवायचे हे ती तुला सांगेल. कोणी तुला गरज आहे पैशांची असे म्हटले तरी तू तिला लगेच फोन कर. असे म्हणत धनंजय पोवार यांनी सुरजला एक चांगली समज दिली आहे. सूरजला व्यवहारिक ज्ञान नाही त्याला लोकं कसेही फसवतात याचमुळे काळजीपोटी त्यानी सुरजला हा सल्ला देऊ केला आहे. बिग बॉसच्या घरात गार्डन एरियामध्ये धनंजय पोवार , अंकिता, सूरज आणि पंढरीनाथ एकत्र बसले होते तेंव्हा धनंजय यांनी सुरजला हे समजावून सांगितले होते. त्यांच्या या सल्ल्यामुळे सुरजचे थोडाफार तरी फायदा होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. प्रेक्षकांनी देखील धनंजय पोवार यांच्या या दिलेल्या सल्ल्याचे कौतुकच केले आहे.