निक्कीनंतर आता जान्हवीला आवरा फुटेज मिळवण्यासाठी गोलीगत राडा….सुरजच्या चाहत्यांनी तिचा रागिटपणा पाहून केल ट्रोल
मराठी बिग बॉसच्या घरातील पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. सतत कोणाशीतरी वाद घालून निक्कीने प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण वरिष्ठांशी अपमानास्पद वागणूक, मराठी माणसांच्या मानसिकतेवर वादग्रस्त विधान यामुळे निक्कीला प्रेक्षकांची माफी मागावी लागली. दरम्यान निक्कीला साथ देणारी जान्हवी आता प्रेक्षकांच्या डोक्यात जाऊ लागली आहे. जान्हवी किल्लेकर हिने मराठी मालिकांमध्ये विरोधी भूमिका साकारलेल्या आहेत. पण तिचे रिअल लाईफ वागणेही तसेच असल्याचे दिसून येत आहे.
कारण फुटेज मिळवण्यासाठी जान्हवी आता घरातील सदस्यांसोबत वाद घालू लागली आहे. सूरज आणि जान्हवीचे जोरदार भांडण झाले आहे. या भांडणात देखील ती आधीसारखीच घरातून बाहेर काढण्यासाठी धमकी देताना दिसत आहे. आर्यासोबत वाद झाल्यानंतर ‘तू या घरात कशी राहते तेच मी बघते’ अशी धमकी देणारी जान्हवी सुरजला सुद्धा त्याच भाषेत धमकावताना दिसत आहे. तिचा हाच रागिटपणा पाहून प्रेक्षकांनी जान्हवीला बाहेर काढण्याची मागणी केली आहे.
जान्हवीने या अगोदर सुरजला चपला उचलण्यासाठी मदत मागितली होती.पण सुरजने तिला स्पष्टपणे नकार दिला होता. ज्याच्या चपला आहेत त्याने त्या उचलाव्यात असे सूरज म्हटल्यानंतर जान्हवीचा पारा चढला होता. सूरज हा अतिशय साधा मुलगा आहे. बिग बॉसच्या घरात कुठलेही डिसीजन घेण्यासाठी तो असमर्थ ठरत आहे पण त्याच्या याच स्वभावाचा घरातील सदस्य फायदा घेत आहेत. निक्की तांबोळीशी पंगा घेतल्यानंतर सूरज भांबावून गेला होता. पण बिग बॉसने आणि रितेश देशमुखने सपोर्ट दिल्यानंतर तो या घरात खुलू लागला. पण आता विकेंड वॉरनंतर जान्हवी सोबत त्याचा वाद झाला आहे. सुरजनेही जान्हवीला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण जान्हवीच्या आगाऊपणामुळे प्रेक्षकांनी तिला बाहेर काढण्याची मागणी केली आहे.