news

पहिल्याच आठवड्यात या सदस्याची बिग बॉसच्या घरातून एक्झिट…एन्ट्री वरूनच प्रेक्षकांनी केलं होत ट्रोल

मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन चांगलाच चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यात निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांना धारेवर धरले होते. तर मराठी माणसांबद्दल निक्कीचे वादग्रस्त वक्तव्य जोरदार चर्चेत राहिले. काल शनिवारी भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुख कडून निक्कीला चांगलीच चपराक बसली. तिच्या सर्व चुका मुद्देसूद लक्षात आणून देत तिला मराठी लोकांची माफी मागायला लावली. दरम्यान घरातील इतर सदस्यांवरही रितेशने चांगलीच खरडपट्टी काढली. खेळात सहभागी न होणाऱ्या सदस्यांना त्याने अनोख्या शैलीत आठवण करून दिली. त्यामुळे आता बिग बॉसचा पुढचा आठवडा एंटरटेनमेंटने भरलेला असेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

purushottam dada patil exit bigboss marathi
purushottam dada patil exit bigboss marathi

कालच्या भागात नॉमिनेट झालेल्या ६ सदस्यांपैकी सूरज चव्हाण आणि वर्षा उसगावकर या दोघांना सेफ असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे पुरुषोत्तम पाटील, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि योगिता चव्हाण या चार सदस्यांमधून कोणता सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्यापैकी धनंजय पोवार, अंकिता वालावलकर आणि योगिता चव्हाण यांना सेफ घोषित केलं तर पुरुषोत्तम पवार बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारे पहिले सदस्य ठरले. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तम पाटील बाहेर जाणार याची प्रेक्षकांनाच नाही तर घरातल्या सदस्यांनाही खात्री होती. धनंजय पोवार आणि पुरुषोत्तम पाटील हे दोघेही अंतिम निर्णयासाठी वाट पाहत असताना धनंजय पोवार सेफ असल्याचे जाहीर झाले.

big boss marathi contestant home
big boss marathi contestant home

त्यामुळे पुरुषोत्तम पाटील यांना पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडावे लागले आहे. घरातील सदस्यांना निरोप देताना पुरुषोत्तम पाटील भावूक झाले. तर घनश्याम सारख्या काही सदस्यांना रडू कोसळले. बिग बॉसच्या घरात पुरुषोत्तम पाटील आले तेव्हाच ते ट्रोल झाले होते. कारण कीर्तनकार अशा शोमध्ये येणे प्रेक्षकांनाच रुचले नव्हते. याअगोदर शिवलीला पाटील यांनीही प्रेक्षकांनी ट्रोल केले होते. त्यामुळे कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील हेही लवकरच बाहेर जातील असा विश्वास होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button