news

पैसे मिळायचे पण लोकांनी त्याला फसवलं राहायला घर नव्हतं म्हणून एक खोली ….सुरजच्या बहिणीचा खुलासा

मराठी बिग बॉसच्या घरात सोशल मीडिया स्टार्सना प्राधान्य दिलेले पाहायला मिळत आहे. अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण , इरिना रोडाकोवा हे सेलिब्रिटी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण थोडासा घाबरलेला पाहायला मिळाला पण स्वतः बिग बॉसनेच त्याला सपोर्ट केल्याने त्याची गाडी पुन्हा रुळावर आलेली पाहायला मिळाली. बिग बॉसमध्ये आल्यानंतर सुरजने त्याची संघर्षमय कहाणी सांगितली होती. आपल्याला खूप पैसे मिळत असल्याचेही तो सांगताना दिसला पण यामध्ये अनेकांनी आपली फसवणूक केली असल्याचे त्यात म्हटलेले दिसले. त्याच्या घरच्या याच परिस्थिबद्दल स्वतः सुरजच्या बहिणीने आणि आत्याने आणखी खुलासे केलेले पाहायला मिळाले आहे.

suraj chavan in bigboss home
suraj chavan in bigboss home

बारामतीमधील मोरवे हे सुरजचं गाव. आई वडील दोघेही हयातीत नाहीत त्यामुळे तो लग्न झालेल्या बहिणींकडे तर कधी आत्याकडे राहून दिवस काढतो. टिकटॉकमधून मिळालेले पैसे त्याच्या मित्रांनी लुबाडले आणि त्यातून त्याला फक्त एक खोली बांधून दिली असे त्याची बहीण या खुलाशात म्हणते. “सूरज खूप साधाभोळा आहे. वडिलांना कॅन्सर झाला होता. वर्षभर ते हॉस्पिटलमध्ये होते पण तिथे त्यांना मुळीच करमत नव्हते त्यामुळे ते हॉस्पिटलमधून ऑपरेशन झाल्यानंतर पळून आले. आम्ही सात बहिणी आमच्या पाठीवर सूरज झाला. मी सातवीत होते तेव्हा सूरज पाचवीला होता. काही दिवसांनी वडील वारले तेव्हा सुरज मित्रांसोबत गोट्या खेळत होता. त्याला वडील वारलेत हे काहीच समजत नव्हतं. माझ्या बहिणींची लग्न झाली होती. याचदरम्यान माझी आई वेड्यासारखं वागू लागली. त्यामुळे मला शाळा सोडावी लागली. आईला रक्ताच्या उलट्या व्हायच्या तिला गाठ सांगितली होती. डॉक्टरांनी ऑपरेशनला ३५ हजार रुपये खर्च सांगितला पण कोणाकडेच एवढे पैसे नव्हते. त्यानंतर काही दिवसात आईचं निधन झालं.

suraj chavan story
suraj chavan story

एक महिन्याने माझंही लग्न झालं. सुरजला आत्या सांभाळू लागली. सूरज बांधकाम करायला जायचा पण त्याला त्यात इंटरेस्ट नव्हता. माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलांनी सुरजला व्हिडीओ कसे बनवायचे ते शिकवलं. टिकटॉकवर तो फेमस झाला. यातून त्याला पैसे मिळायचे पण लोकांनी त्याला फसवलं. त्या पैशातून एक साधी खोली त्याला बांधून दिली. बिग बॉसमध्ये त्याला बोलावलं तेव्हा तो यायला तयार नव्हता. मला तिथं करमणार नाही असे ते सांगू लागला. पण साहेबांनी समजावलं तेव्हा तो तयार झाला. तो टीव्हीवर दिसतोय छान खेळतोय पाहून खूप भारी वाटतंय. बिग बॉसच्या घरात जायच्या अगोदर त्याने बँकेचं खातं उघडलं. आधारकार्ड ते सगळं बनवून घेतलं. तो बिग बॉसचा विजेता व्हावा अशी आमची ईच्छा आहे आणि तो नक्की जिंकेल”. असा सुरजवर त्यांच्या बहिणीचा विश्वास आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button