news

शशांक केतकरच्या घराचा व्हिडिओ होतोय व्हायरल… सगळीकडे सुंदर हिरवळ पाहून चाहते झाले खुश

अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असलेला पाहायला मिळतो. समाजात वावरताना काही गोष्टींवर तो त्याची परखडपणे मतं देखील मांडताना दिसतो. सध्या शशांक मुरांबा या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. एरवी शशांक त्याच्या पर्सनल गोष्टी सोशल मीडियावर फारसा शेअर करत नाही. अगदी तीन वर्षीचा त्याचा मुलगा ऋग्वेद यालाही त्याने सोशल मिडियापासून दूर ठेवलेलं आहे. पण त्याच्या काही गमतीजमती तो सोशल मीडियावर शेअर करतो. पण अशातच शशांकने त्याच्या सुंदर घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. त्यामुळे शशांकच्या या घराचे सोशल मीडियावर मोठे कौतुक केले जात आहे.

shashank ketkar home
shashank ketkar home

शशांकच्या घराचा हॉल हा अगदी मन प्रसन्न करून टाकणारा आहे. भरपूर उजेड आणि आटोपशीर सुखवस्तूंमुळे त्याच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा आहे असे वाटते. सुंदर आणि टापटीप दिसणाऱ्या घराच्या हॉलला लागूनच एक खिडकी आहे. या खिडकीत त्याने काही फुलझाडांच्या कुंड्या ठेवल्या आहे. सध्या पावसामुळे त्याच्या या छोट्याशा गार्डनमधली रोपांना छान बहर आला आहे. घराची आणि गार्डन एरियाची त्याने या व्हिडिओतून ओळख करून दिली आहे. त्यामुळे शशांकचे हे सुंदर घर सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

शशांक केतकरने वकील असलेल्या प्रियांका ढवळेसोबत प्रेमविवाह केला. २०२१ मध्ये त्याला पुत्ररत्न प्राप्ती झाली. पण अजूनही शशांकने त्याच्या मुलाला रिव्हील केलेलं पाहायला मिळालं नाही. ऋग्वेद आता ३ वर्षांचा झाला आहे. काही दिवसांपूर्वी शशांकने त्याचे हेडफोन सापडत नसल्याचे म्हटले होते. पण ऋग्वेदने खेळताना हे हेडफोन खिडकीतून खाली टाकून दिले होते. त्याचा ह्या बाललीला शशांकने चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button